Dengue in Children : पावसाळ्यात लहान मुलांचा डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
मान्सूनमध्ये डेंग्यूचा धोका अधिक वाढतो. लाखो लोकांना डेंग्यू होतो, ज्यात लहान मुलांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्या मुलांचा डेंग्यूपासून बचाव करायचा असेल तर या टिप्स फॉलो करा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएडिस डासामुळे डेंग्यू होत, ज्यांची वाढ साचलेल्या पाण्यात वाढतात. अशावेळी, डासांच्या उत्पत्तीचा धोका कमी करण्यासाठी अशी ठिकाणे ओळखा. तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा गच्चीवर कुठेही साचलेलं पाणी असल्यास ते त्वरित स्वच्छ करा.
पावसाळ्यात आपल्या मुलांना बाहेर खेळू देऊ नका. कारण अनेक भागात पाणी साचलेलं असतं जे डेंग्यू पसरवणाऱ्या डासांचे घर बनलेलं असतं. घराबाहेर जाण्याची गरज भासली तर तुमच्या मुलांनी अंगभर कपडे घातले आहेत की नाही याची खात्री करा
तुमच्या मुलांसाठी डासमुक्त वातावरण तयार करा. संध्याकाळी खिडक्या आणि दरवाजे बंद करा. तसंच मच्छरदाणीचा वापर करा. यामुळे डास चावण्याचा धोका कमी होऊ शकतो. खोलीचे तापमान थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. थंडीच्या वातावरणात डासांची उत्पत्ती कमी होते.
खोलीचे तापमान थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. थंडीच्या वातावरणात डासांची उत्पत्ती कमी होते.
पावसाळ्याच्या संध्याकाळी तुमच्या मुलाला लांब बाह्यांचा टी-शर्ट, फुल पॅन्ट, मोजे आणि बंद पायाचे शूज घाला. तसेच, त्यांना हलक्या रंगाचे कपडे घाला. यामुळे डास टाळता येतील. याशिवाय घराच्या कानाकोपऱ्यात डास मारण्याचे औषधांचा वापर करा.
डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी मुलांच्या उघड्या त्वचेवर मॉस्क्युटो रेपेलंटचा वापर करा. त्यामुळे डास लहान मुलांच्या जवळही येणार नाहीत. मॉस्क्युटो रेपेलंट वापरताना ते मुलांचे डोळे आणि तोंडापर्यंत पोहोचू नये याची काळजी घ्या.
डेंग्यूपासून बालकांना वाचवण्यासाठी त्यांना डेंग्यूच्या धोक्याबाबत माहिती देणं गरजेचं आहे. पावसाळ्यात डेंग्यूचा प्रसार होईल अशी कोणती ठिकाणं आहेत, हे मुलांना सांगा.