Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Tourism Day : आज जागतिक पर्यटन दिन, भारतातील 'या' पर्यटनस्थळांना आवर्जून भेट द्या...
आज जागतिक पर्यटन (World Tourism Day) दिवस आहे. संपूर्ण जगात आज हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भारतही पर्यटन दृष्टीने समृद्ध देश आहे. देश-विदेशातील पर्यटक भारतातील विविध स्थळांना भेट देऊन येथील अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेरात कैद करतात. भारतातील अशाच काही पर्यटन स्थळांबद्दल तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलडाख: हे असे स्थान आहे, जिथे तुम्ही फक्त मे महिन्याच्या शेवटी जाऊ शकता. बाईकवरुन लडाखला जाण्याची तरुणांमध्ये वेगळीच क्रेझ असते. इथे पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.
दार्जिलिंग: दार्जिलिंगला क्वीन ऑफ हिल्स म्हटलं जातं. पश्चिम बंगाल स्थित दर्जिलिंग हे चहाच्या मळ्यांसाठीही विशेष प्रसिद्ध आहे. याशिवाय येथील डोंगर दऱ्यांमध्ये विस्तारलेली हिरवीगार वनराई पर्यटकांवर नेहमीच भूरळ घालते.
म्हैसूर: म्हैसूरला राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला भेट देण्यासाठी पर्यटक अतिशय आतूर असते.
केरळ: दक्षिणेतील केरळही पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला मोठा समुद्र किनारा लाभल्यामुळे अनेक सुंदर बीच, सोबतच हिरव्यागार वनराईची चादर ओढलेले डोंगर रांगा पर्यटकांचे लक्ष्य नक्की वेधून घेतात. केरळमधील चुआर बीच, कोवलम बीच, मरुदेश्वर बीच, बेकल बीच वर्कला बीच आणि शांघमुघम बीच आदी बीच प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्रातील गडकिल्ले हे जगभरातील पर्यटकांसाठी पर्वणी आहेत. सह्याद्रीच्या विस्तीर्ण रांगांमुळे महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण राज्यात किल्ल्याची बांधणी करुन हिंदवी साम्राज्याची स्थापना केली.
उदयपूर: राजवाड्यांचं शहर म्हणून ओळख असलेल्या राजस्थानमधील उदयपूरमध्ये अनेक जुने राजवाडे आहेत. उदयपूरचे नाव पूर्वी मेवाड असे होते. या शहराला ऐतिहासिक महत्त्व असल्याने त्याची ओळख पॅलेस सिटी म्हणून ओळखले जाते. या शहरातील सिटी पॅलेस संग्राहलय आणि सिटी पॅलेस कॅम्पलेक्स ही प्रेक्षणिय स्थळे आहेत.