NCC Day : नोव्हेंबरमध्ये एनसीसी दिवस का साजरा होतो?
महाविद्यालयीन तरुणांमध्ये लष्करी शिस्त आणि जबाबदार नागरीक घडवणाऱ्या नॅशनल कॅडेट कोर (NCC)आज आपला 73 वा स्थापना दिवस साजरा करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएनसीसीची स्थापना 15 जुलै 1948 रोजी करण्यात आली. भारतीय संरक्षण कायदा-1917 नुसार लष्करातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्याच्या उद्देशाने एनसीसीची स्थापना झाली. एनसीसीमध्ये 1949 पासून मुलींचा समावेश करण्यात येऊ लागला होता.
एनसीसीची स्थापना 15 जुलै 1948 रोजी करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या दर चौथ्या रविवारी एनसीसी दिवस साजरा करण्यात येतो. त्याचे कारणही खास आहे. सन 1947 मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी दिल्लीत एनसीसीच्या पहिल्या युनिटची स्थापना झाली होती.
वर्ष 1965 आणि 1971 मध्ये जेव्हा पाकिस्तानशी युद्ध झाले तेव्हा एनसीसी कॅडेट्सना शस्त्रास्त्र कारखान्यांमध्ये पाठवण्यात आले जेणेकरून ते आघाडीवर तैनात असलेल्या सैनिकांना शस्त्रे आणि दारूगोळा पाठविण्यात मदत करू शकतील.
त्याशिवाय शत्रूंच्या पॅराट्रुपर्सना पकडण्यासाठीच्या गस्त पथकात त्यांचा समावेश करण्यात आला होता. NCC कॅडेट्स नागरी संरक्षण अधिकार्यांच्या खांद्याला खांदा लावून बचाव कार्यात आणि वाहतूक नियंत्रणातही मदत करतात.
एनसीसीमध्ये सहभाग घेण्यासाठी भारतीय नागरीक असणे आवश्यक आहे. त्याशिवाय नेपाळच्या नागरिकांनाही एनसीसीमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो.
एनसीसीत प्रवेश घेण्यासाठी किमान 12 वर्ष आणि अधिकाधिक 26 वर्ष अशी वयोमर्यादा आहे.
एनसीसीमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना प्रवेश घेता येऊ शकतो. त्यामुळेच त्यांचे चार विभाग आहेत. प्रत्येकी दोन-दोन विभाग मुले आणि मुलींसाठी आहे.
मुलांच्या विभागाला कनिष्ठ विभाग (JD) आणि वरिष्ठ विभाग (SD) आणि मुलींच्या विभागाला ज्युनियर विंग (JW) आणि वरिष्ठ विभाग (SW) म्हणतात.