Indian Railways : खुशखबर! तिकीट नाहीये? तरीसुद्धा ट्रेननं करता येईल प्रवास, पण कसा?
Indian Railways : तुम्हीही रेल्वेनं प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी खुशखबर. तुम्ही रेल्वेनं प्रवास करत असाल आणि तुमच्याकडे तिकीट नसेल, तरी आता टेन्शन घेण्याची गरज नाही. रेल्वेनं यासाठी एक खास नियम तयार केला आहे. ज्यामुळे तुम्ही विना तिकीट टेन्शन फ्री प्रवास करु शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्ही रिझर्वेशन केलेलं नसेल, तर तुम्ही केवळ प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढू शकता आणि त्यानंतर मात्र तुम्हाला टीटीईशी संपर्क साधावा लागेल. तुम्हाला टीसीकडे जावं लागेल आणि तिथे जाऊन तुम्ही प्रवासासाठी तिकीट घेऊ शकता.
टिसीकडे गेल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला त्यांना सर्व गोष्टी सांगाव्या लागतील. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या प्रवासासाठी तिकीट मिळेल.
दरम्यान, ट्रेनमध्ये सीट नसल्यामुळे तुम्हाला रिझर्व्ह सीट मिळण्यासाठी त्रास होऊ शकतो. परंतु, तरीदेखील टिसी तुम्हाला प्रवास करण्यापासून रोखू शकत नाही. जर तुमच्याकडे रिझर्व्हेशन नसेल, तर तुम्हाला 250 रुपये पेनल्टी चार्ज द्यावा लागेल.
प्रवाशांना तिकीटासाठी एकूण दरासोबतच 250 रुपयांचा पेनल्टी चार्ज द्यावा लागेल. प्लॅटफॉर्म तिकीट ठेवल्यानंतर प्रवाशी ट्रेनमध्ये चढू शकतो. दरम्यान, प्रवाशांना त्याच स्थानकापासून तिकीट घ्यावं लागेल, जिथपासून प्लॅटफॉर्म तिकीट घेतलं आहे.
याव्यतिरिक्त तुमची ट्रेन कोणत्याही कारणानं सुटली तर टिसी पुढच्या दोन स्थानकांपर्यंत तुमची सीट इतर कोणालाही देऊ शकत नाही.
याव्यतिरिक्त तुमची ट्रेन कोणत्याही कारणानं सुटली तर टिसी पुढच्या दोन स्थानकांपर्यंत तुमची सीट इतर कोणालाही देऊ शकत नाही.