Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतीय नौदलाची ताकद वाढणार, स्कॉर्पियन श्रेणीची चौथी पाणबुडी 'INS VELA' नौदलात दाखल!
स्कॉर्पियन श्रेणीची चौथी पाणबुडी वेलाचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे. (photo twitted by @DefPROMumbai)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयएनएस वेलाचा समावेश झाल्यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे. (photo twitted by @DefPROMumbai)
यावेळी भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी पाकिस्तान आणि चीनच्या हालचालींवर भारताचे लक्ष असल्याचे म्हटले. (photo twitted by @DefPROMumbai)
आयएनएस वेला ही चौथी भारतीय पाणबुडी आहे. (photo twitted by @DefPROMumbai)
कोरोना महासाथीमुळे काही अडचणी समोर आल्या होत्या. मात्र, त्यावर मात करण्याचा प्रयत्न झाल्याचे अॅडमिरल करमबीर सिंग यांनी म्हटले. (photo twitted by @DefPROMumbai)
आयएनएस वेलामुळे भारतीय नौदलाच्या ताकदीत वाढ झाली आहे. (photo twitted by @DefPROMumbai)
आजची गतिमान आणि गुंतागुंतीची सुरक्षा परिस्थिती पाहता, भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी नौदलाची क्षमता वाढवण्यात आयएनएस वेला मोठी भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी म्हटले. (photo twitted by @DefPROMumbai)
नौदल प्रमुख म्हणून मी सर्वांचे आभार मानतो. माझ्या कार्यकाळात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि कोरोनाचे मोठे आव्हान होते. त्यानंतरही आम्ही दुसऱ्या देशांमधून लिक्विड ऑक्सिजन आणले. (photo twitted by @DefPROMumbai)
त्याशिवाय त्यांना मदतही केली. आम्ही चीन आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या परस्पर सहकार्यावरही आमचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. (photo twitted by @DefPROMumbai)
प्रोजेक्ट 75 अंतर्गत सहा पाणबुड्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. यातील तीन पाणबुड्या याआधीच भारतीय नौदलात रुजू झाल्या आहेत. आज चौथी पाणबुडी दाखल झाली आहे. (photo twitted by @DefPROMumbai)
आयएनएस वेलामध्ये अॅडवान्स एकॉस्टिक सायलेन्सिंग तंत्रज्ञान आहे. रेडिएटिड नॉइस लेव्हलही कमी आहे. (photo twitted by @DefPROMumbai)
पाणबुडी ही हायड्रो-डायनामिक आहे. लक्ष्याचा अचूक निशाणा साधण्यासह शत्रूला मोठा धक्का देण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे. (photo twitted by @DefPROMumbai)