PHOTO : Lakhimpur Kheri मध्ये नेमकं काय घडलं? जाणून घेऊया या फोटोंच्या माध्यमातून...
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे रविवारी एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून परिस्थिती तणावपूर्ण आहे.
या घटनेनंतर शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन अधिक उग्र केलं आहे. प्रशासनाने या परिसरात 144 कलम जारी करुन जमावबंदीचा आदेश काढला आहे.
आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतांवर अंतिम संस्कार करण्यात येणार नाही असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी दिला आहे.
लखीमपूर खेरी या ठिकाणी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटायला जाणाऱ्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना अटक केल्याची माहिती युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी दिली आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर, आशिष मिश्रावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या दबावामुळे पोलिसांनी आशिष मिश्रावर हत्या, गैरव्यवहार, दुर्घटना करण्याचा हेतू अशा विविध आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे.
या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलंच तापलं असून विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.