PHOTO : राष्ट्रपिता Mahatma Gandhi आपल्याला काय कानमंत्र देतायंत? गांधीवाद काय सांगतो?
जगात बदल घडवायचा असेल तर तो बदल प्रथम स्वत:मध्ये घडवा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुर्बल कधीही कोणाला क्षमा करु शकत नाही. क्षमा करणे हा सामर्थ्यवानाचा गुणधर्म आहे.
प्रतिशोध हा असा गुण आहे जो जगाला आंधळा बनवतो.
थोडासा संयम हा हजारो उपदेशांपेक्षा अधिक मौल्यवान आहे.
अगदी सभ्य मार्गानेही तुम्ही जगाला हादरवून सोडू शकता.
आपण शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय विचार करतो, काय बोलतो आणि काय कृती करतो यावर आपले समाधान अवलंबून आहे.
मनुष्य हा त्याच्या विचाराची निर्मिती आहे. तो कसा विचार करतो त्याचप्रमाणे त्याचे चारित्र्य ठरते.
एखाद्या देशाच्या सभ्यपणाची परीक्षा घ्यायची असेल तर त्या देशात प्राण्यांना कशी वागणूक दिली जाते ते पहा.
हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरतं असतं. पण त्यामुळे होणारं नुकसान मात्र दीर्घकालीन असतं.
मानवतावादावरचा विश्वास ढळू देऊ नका. मानवतावाद हा अथांग समुद्र आहे. या समुद्रातील काही थेंब प्रदूषित असू शकतात, पण त्यामुळे सर्व समुद्र प्रदूषित होऊ शकत नाही.