Bengal Panchayat Election Result : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला पंचायत निवडणुकांमध्ये मोठं यश, पक्षाकडून जल्लोष
याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेसला दिलेल्या मतांसाठी जनतेचे आभार मानले आहेत.
विरोधकांवर निशाणा साधत त्यांनी म्हटलं की, 'नो वोट टू ममता' हे अभियान आता 'वोट फॉर ममता' मध्ये रुपांतरीत होत आहे.
पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'आम्हाला लोकसभा निवडणुकांच्या वेळी देखील अशाच पद्धतीने लोकांचा पाठिंबा मिळत आहे.'
संध्याकाळी 7.30 पर्यंत निवडणुक आयोगाने दिलेल्या आकडेवारी नुसार, तृणमूल काँग्रेसला पंचायत निवडणुकांमध्ये 118 जागांवर विजय मिळवला आहे.
यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार देखील झाला होता.
पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांसाठी 8 जुलै रोजी मतदान करण्यात आले होते.
त्यामुळे निवडणुक आयोगाने 10 जुलै रोजी पश्चिम बंगालमध्ये पुन्हा मतदान करण्यात आले होते.