Rainfall Alert: देशात 'जलप्रलय', हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
हवामान विभागाने उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात 12 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तराखंडमधील परिस्थिती लक्षात घेता नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये 11 आणि 12 जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
राजधानी दिल्लीत यमुना नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय नागालँड, मिझारोम आणि त्रिपुरामध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पंजाबमध्येही पावसाने जोरदार बँटींग केली आहे.
झारखंड, तेलगंणा, ओडिशा आणि मध्य प्रदेशातही हवामान खात्याकडून इशारा देण्यात आला आहे.
पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तर रस्ते वाहतूकीवर परिणाम झाला आहे.