Weekly Recap : कसा होता आठवडा? देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फोटोंच्या माध्यमातून...
India This Week: सरत्या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. काही दिलासा देणाऱ्या तर काही अंगावर शहारे आणणाऱ्या. काही थरकाप उडवणाऱ्या तर काही आनंद देणाऱ्या. खरंतर सरता आठवडा इतर घडामोडींसोबतच राजकीय घडामोडींना गाजला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आठवडाभरातील अशाच काही चांगल्या, वाईट आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आम्ही तुमच्यासाठी सविस्तपणे घेऊन आलोय फोटोंच्या माध्यमातून...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतानं पाकिस्तानमधून चालणाऱ्या 14 मेसेंजर अॅप्सवर बंदी घातली. (1 मे 2023)
एबीपी माझाचा 'महाकट्टा', एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'ला अकरा वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्तानं 'महाकट्टा'चं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाच्या महाकट्टा सोहळ्यात 'कट्टा नात्यांचा, सोहळा संवादाचा' साजरा करण्यात आला. कट्ट्यावर राजकीय, मनोरंजन, क्रिडा विश्वातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. (5 मे, 2023)
2 मे रोजी 'लोक माझे सांगाती' पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केलेली. (2 मई, 2023)
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्करानं एक एके 47 रायफल, एक पिस्तूल आणि इतर दारूगोळाही जप्त केला आहे. (4 मे, 2023)
शिमला महापालिकेत काँग्रेसला 10 वर्षानंतर मोठा विजय मिळाला. काँग्रेसनं आपच्या सर्व जागा जिंकल्या. (4 मे, 2023)
भारतानं यावर्षी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेचे अध्यक्षपद भूषवलं, भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गोव्यात अनेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. (4 मे, 2023)
जंतरमंतरवर निदर्शनं करणाऱ्या कुस्तीपटू आणि दिल्ली पोलिसांमध्ये झटापटी झाली. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधाक कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन करत आहेत. (4 मे, 2023)
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच. शरद पवारांनी आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडेच. (5 मे, 2023)
भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. सुवर्णवेध साधत 'दोहा डायमंड लीग'चा खिताब नीरज चोप्रानं पटकावला आहे. (5 मे, 2023)
आता कोरोना सामान्य आजार. कोरोनाची लाट संपली, कोरोना आजारबाबत जागतिक आरोग्य आणीबाणी नाही, जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) मोठी घोषणा (5 मे, 2023)