Rajouri Encounter: राजौरीमध्ये 15 दिवसांपासून लष्कराचं अँटी टेररिज्म ऑपरेशन; दहशतवाद्यांचा कसून घेतला जातोय शोध
Rajouri Terror Attack: शुक्रवारी, 5 मे रोजी जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील कांडी जंगल परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात लष्कराचे पाच जवान शहीद झाले आणि एक प्रमुख अधिकारी जखमी झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या महिन्यात पुंछ जिल्ह्यातील भाटा धुरियन येथे लष्कराच्या ट्रकवर हल्ला करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या एका गटाच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली होती, जी अजूनही सुरू आहे. गेल्या महिन्यात या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते.
शुक्रवारच्या हल्ल्यापूर्वी, पुंछ आणि राजौरी या दोन सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर 2021 पासून सात मोठ्या दहशतवादी घटना घडल्या, ज्यात 22 लष्करी जवानांसह 29 लोक मरण पावले. राजौरी भागात सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईमुळे मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
लष्कराच्या उत्तरी कमांडनं जारी केलेल्या निवेदनात सांगितलं की, गेल्या महिन्यात जम्मू सेक्टरमधील भाटा धुरियनच्या तोता गली भागांत लष्कराच्या ट्रकवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाचा खात्मा करण्यासाठी सतत गुप्त सूचनांच्या आधारावर ऑपरेशन सुरू आहे.
राजौरी सेक्टरमधील कंडी जंगलात दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीच्या आधारे 3 मे रोजी एक संयुक्त ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं.
शुक्रवारी सकाळी 7.30 च्या सुमारास शोध पथकानं गुहेत लपलेल्या दहशतवाद्यांच्या गटाला घेरलं. आजूबाजूला खडक आणि डोंगर असलेला हा भाग अतिशय घनदाट जंगल आहे., असं लष्करानं निवेदनात म्हटलं आहे.
लष्कराच्या निवदेनात म्हटलंय की, दहशतवाद्यांचाही घातपात होण्याची शक्यता असून कारवाई सुरू आहे. शहीद जवानांमध्ये उत्तराखंडमधील गैरसैन येथील लान्स नायक रुचिन सिंह रावत, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील 'पॅराट्रूपर' सिद्धांत छेत्री, हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील नाईक अरविंद कुमार, जम्मूमधील हवालदार नीलम सिंह आणि हिमाचलमधील सिरमौर येथील 'पॅराट्रूपर' प्रमोद नेगी यांचा समावेश आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) मुकेश सिंह घटनास्थळी पोहोचले आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला, असं लष्कराने सांगितलं आहे.
राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात सुरक्षा दल गेल्या 15 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन राबवत आहेत. 20 एप्रिल रोजी भट्टा धुरियन येथे लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यानंतर ही कारवाई सुरू झाली, ज्यामध्ये पाच सैनिक ठार झाले आणि अन्य एक जखमी झाला होता.