Rain : मुसळधार पावसामुळं राजस्थानसह मध्य प्रदेशात जनजीवन विस्कळीत
देशातील काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. तर काही राज्यामध्ये अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्य प्रदेशसह (Madhya Pradesh) राजस्थानमध्ये (Rajasthan) सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मध्य प्रदेशात मुसळधार पावसानंतर परिस्थिती बिकट झाली आहे.
मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसानंतर तेथील परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे
अनेक नद्यांना पूर आला आहे. पावसाचे पाणी घरात आणि दुकानात शिरल्याने नागरिकांची अडचण झाली आहे.
काही भागात वाहनेही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. आजही मध्य राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज (17 सप्टेंबर) राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राजस्थानमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.
दिल्लीमध्ये हवामान बदल झाला आहे. अधूनमधून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.
उत्तराखंडमध्येही 20 सप्टेंबरपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.