India: देशातील या आठवडाभरातील महत्त्वाच्या घडामोडी; पाहा फोटोंमधून
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी (11 सप्टेंबर) हैदराबाद हाऊसमध्ये सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स सलमान यांची भेट घेतली आणि राष्ट्रपती भवनात प्रिन्स सलमान यांचं स्वागत करण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (11 सप्टेंबर) यूके-इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग ब्रिजचं लोकार्पण केले. यावेळी ब्रिटनचे अर्थमंत्री जेरेमी हंटही उपस्थित होते.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी हिमाचल दौऱ्यावर असताना मंगळवारी (12 सप्टेंबर) कुल्लू, मनाली आणि मंडी येथील आपत्तीग्रस्तांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अनेक नेतेही उपस्थित होते.
कोलकात्यात मुसळधार पावसानंतर बुधवारी (12 सप्टेंबर) अनेक ठिकाणी पाणी साचलं, त्यानंतर लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांची मंगळवारी (12 सप्टेंबर) मुंबईत बैठक झाली. पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही बैठक झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (14 सप्टेंबर) मध्य प्रदेशातील बिना येथे रिमोटचं बटण दाबून 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी केली.
मंगळवारी (12 सप्टेंबर) जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये सुरक्षा दलांनी चकमकीत एका दहशतवाद्याला ठार केलं, यावेळी एक जवानही शहीद झाले.
गुरुवारी (14 सप्टेंबर) गाझियाबादमध्ये दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर रोडवेजची बस सुमारे 12 फूट दरीत घसरली. या घटनेत 20 प्रवासी जखमी झाले.
काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात शुक्रवारी (15 सप्टेंबर) दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक सुरूच होती.
काश्मीरमधील अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत दोन शहीद जवानांना शुक्रवारी (15 सप्टेंबर) साश्रूनयनांनी अंतिम निरोप देण्यात आला.