Weather : देशात कुठं थंडीचा कडाका, तर पावसाचा इशारा
देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी झालेल्या पावसानंतर तापमानात घट झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तराखंडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि इतर भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
पुढील काही दिवस देशातील अनेक भागात वातावरण थंड राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत राजधानी दिल्लीत धुके पडेल.
उत्तर प्रदेशातही पावसानंतर वातावरण आल्हाददायक आहे. पावसानंतर नागरिकांना प्रदूषणापासून दिलासा मिळाला
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, लखनौसह उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तराखंड हवामान अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. याशिवाय आज चमोली, पिथौरागढ आणि बागेश्वरच्या उंच भागात बर्फवृष्टी होऊ शकते.