विनेश फोगाटनं हरियाणाच्या जुलानामधून निवडणूक अर्ज दाखल; प्रतिज्ञापत्रात नमूद संपत्तीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं जुलाना मतदारसंघातून माजी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट यांच्यावर बाजी मारली आहे. विनेश फोगाटला काँग्रेसनं उमेदवारी दिल्यामुळे जुलानावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविनेश फोगटनं उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात 2023-2024 या वर्षाची तिची एकूण मिळकत 13 लाख 85 हजार 152 रुपये नोंदवली आहे.
तसेच, विनेश फोगाटनं तिचे पती सोमवीर राठी यांचं वार्षिक उत्पन्न 3.44 लाख रुपये असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय विनेश फोगाटकडे 1.95 लाख रुपये आणि पतीकडे 15 हजार रुपये रोख असल्याचं सांगितलं आहे.
विनेश फोगटची वाहनं, सोनं, रोखे, बँक खाती इत्यादींसह एकूण स्थावर मालमत्ता सुमारे 1.10 कोटी रुपये आहे. यामध्ये Volvo XC60 कार, Hyundai Creta, Toyota Innova आणि TVS Jupiter वाहनांचा समावेश आहे.
दरम्यान, विनेश फोगटच्या पतीकडे महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आहे. याशिवाय विनेश फोगट यांच्याकडे एकूण 2 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
एवढंच नाही तर विनेश फोगट यांच्या नावावर कारचं कर्जही आहे, टोयोटा इनोव्हा गाडी घेण्यासाठी विनेशनं कर्ज घेतल्याची माहिती मिळत आहे. हे कर्ज सुमारे 13.61 लाख रुपये आहे.
जुलाना मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार विनेश फोगट यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर सांगितलं की, ती आणि तिचे सहकारी दोन वर्षांपासून रस्त्यावर संघर्ष करत होते, तेव्हा दीपेंद्र हुड्डा सुरक्षेशिवाय त्यांना भेटायला आले होते. हरियाणातील खेळांची स्थिती वाईट आहे, त्यामुळे याकडे लक्ष देण्याची विनंतीही तिनं यावेळी केली.
विधानसभेत जनतेच्या हक्कासाठी लढणार असल्याचा दावाही विनेश फोगटनं केला आहे.