Vande Bharat Sleeper : वंदे भारत स्लीपर ट्रेनचा 'फर्स्ट लूक', वेगवान प्रवास आता आणखी आरामदायी होणार
वंदे भारत लवकरच स्लीपर ट्रेनच्या प्रकारात प्रवाशांसमोर येणार आहे. त्यामुळ वंदे भारतचा वेगान प्रवास आता आणखी आरामशीर होईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनची झलक दाखवणारे फोटो सोशल मीडियावर शेअर केलं आहेत.
रेल्वे मंत्र्यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनचा फर्स्ट लूक आणि आतमधील डिझाईन दाखवणारे फोटो शेअर केले आहेत.
वंदे भारत स्लीपर ट्रेन पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.
इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) आणि भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) द्वारे वंदे भारत स्लीपर कोच संयुक्तपणे तयार केले जात आहेत.
स्वदेशी सेमी-हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या कोच मॉडेलचे फोटो शेअर करताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, वंदे भारत एक्स्प्रेसची स्लीपर आवृत्ती 2024 च्या सुरुवातीला लाँच केली जाईल.
वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या आतमधील फोटो आलिशान वाटेल. या गाड्यांमधला प्रवास एखाद्या लक्झरी हॉटेलसारखा असेल.
वंदे भारत स्लीपर ट्रेन आधुनिक सुविधांसह तयार करण्यात येत आहे. त्याची रचना आधुनिक असून प्रवाशांची सोय लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.
त्यामुळे प्रवाशांना वंदे भारत स्लीपर ट्रेनमधून अतिशय आरामदायी आणि सुखकर प्रवास करता येईल.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या फोटो ट्रेनच्या आतील अत्याधुनिक सुविधांचा किती आरामदायी असतील याचा अनुभव मिळेल.
स्लीपर कोचमध्ये अधिक आरामदायक आसनांसह क्लासिक लाकडी डिझाइन आहे. डब्यांमध्ये फ्लोअर लाइटनिंग आणि उत्तम प्रकाश व्यवस्था असेल.