Lifestyle: घरात ठेवू नका 'या' 10 वस्तू; वाईट आणि नकारात्मक गोष्टींपासून होईल सुटका
तुटलेल्या वस्तू: घरात तुटकी भांडी, काचा, तुटलेलं इलेक्ट्रिक सामान, तुटलेलं कपाट, पलंग, बंद घड्याळ, असं कोणतंही सामान घरात ठेवू नये. याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे फोटो ठेवू नका: बुडत्या जहाजाचे फोटोफ्रेम, महाभारताच्या युद्धातील चित्र, नटराजची मूर्ती, ताजमहालचे चित्र घरात लावू नये. याने नकारात्मकता वाढते आणि मनावर वाईट परिणाम होतो.
जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचं गाठोडं: अनेकांच्या कपाटात खाली किंवा घरातल्या कोणत्या तरी कोपऱ्यात जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचं गाठोडं ठेवलेलं असतं. यामुळेही वाईट गोष्टी घडतात.
फाटक्या चादरी आणि कपडे: या गोष्टींमुळेही घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे असे कपडे दान केले पाहिजे.
भंगार: अनेक लोक घरात भंगार जमा करून ठेवतात. जुन्या-फाटलेल्या चपला वैगेरे घरात ठेवू नका, यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते.
फाटलेल्या पर्स: कधीही फाटलेल्या पर्स वापरू नये, यामुळे तुमचा आहे तो पैसा निघून जाईल.
तुटलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो: देवी-देवतांच्या तुटलेल्या मूर्ती ठेवल्याने आर्थिक स्थिती खालावते, घरावर विघ्न येतात. त्यामुळे असे फोटो नदी, तलावांत विसर्जित केले पाहिजे.
कोळी जाळं: घरात कोळ्यांचं जाळं असल्यास ते त्वरित काढून टाकावं, यामुळेही वाईट गोष्टी घडतात.
प्लास्टिकच्या वस्तू: किचनमध्ये किंवा घरात प्लास्टिकच्या वस्तू वापरणं बंद केलं पाहिजे. या वस्तू वापरण्याने त्यातील विषारी तत्त्व शरिरात पोहोचतात आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका वाढतो.
दगड: अनेक लोकांना आपल्या घरात शोपीसचे दगड ठेवण्याची हौस असते, पण यामुळे बरंच नुकसान होतं.