Uttarakhand Tunnel Collapse : दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून बोगद्यात अडकले 41 मजूर, बचावकार्य युद्धपातळीवर; 25 मीटर ड्रिलिंग बाकी
सिल्क्यारा बोगद्यात 25 मीटर ड्रिलिंग बाकी आहे. 60 ते 70 मीटर लांबीचे पाइप टाकले जाणार असून NDRF टीम आत जाऊन कामगारांची सुटका करेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रशासनाकडून मजुरांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे. उत्तरकाशीत बोगद्यात मजुर अडकल्याने संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला आहे.
उत्तराखंडच्या उत्तरकाशीच्या सिल्कयारा बोगद्यात अडकलेले ४१ मजूर लवकरच बाहेर येण्याची अपेक्षा आहे.
अमेरिकन ऑगर मशीनने बोगद्याच्या प्रवेशापासून सुमारे 40 मीटरपर्यंत 800 मिमी पाईप ड्रिल करण्यात आले आहे.
आता सुमारे 25-30 मीटर ड्रिलिंग बाकी आहे. आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या ड्रिलिंग पूर्ण होण्याची शक्यता आहे.
41 मजूर गेल्या 11 दिवसांपासून बोगद्यामध्ये अडकलेले आहेत. मजुरांना चारही बाजूंनी दगड-मातीचा वेढा आहे.
11 दिवस मजुरांची झुंज सुरु आहे. मजुरांना अन्न, पाणी आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरु आहे.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बोगद्याचं काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळला आणि हे सगळे मजूर आतच अडकले.
बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जात आहे.
मजुरांसोबत वॉकी-टॉकीने संवाद साधला जात असून वेळोवेळी आतील परिस्थितीची माहिती घेतली जात आहे.
पाईपलाईनद्वारे मजुरांना ऑक्सिजन, पाणी आणि अन्न पुरवलं जात आहे.