Uttarakhand : उत्तरकाशीमध्ये बोगद्यात अडकलेल्या 41 मजूरांना 9 दिवसांनंतर पहिल्यांदा मिळाली खिचडी..
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे निर्माणाधीन बोगद्यात गेल्या दहा दिवसांपासून 41 मजूर अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी 200 हून अधिक लोकांची टीम 24 तास बचावकार्य करत आहे. (Photo : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सोमवारी पहिल्यांदा अन्न पाठवण्यात आलं आहे. नऊ दिवसानंतर पहिल्यांदाच बोगद्यामध्ये अडकलेल्या मजुरांना खिचडी पाठवण्यात आली. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.(Photo : PTI)
उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 41 मजूर 12 नोव्हेंबरपासून अडकले आहेत. 16 नोव्हेंबर रोजी बचाव कार्यादरम्यान, बोगद्यातून आणखी दगड पडले, ज्यामुळे मलबा एकूण 70 मीटरपर्यंत पसरला आहे.(Photo : PTI)
बोगदा बांधकाम तज्ज्ञांच्या मते, सध्याची परिस्थिती पाहता कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणखी पाच दिवस ते एक आठवडा लागू शकतो. बोगदा कोसळल्यानंतर मलबा हटवण्याच्या चुकीमुळे बचावकार्याचा वेळ वाढला आहे(Photo : PTI)
कामगारांना जेवण मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये दिलासादायक वातावरण आहे. मजुरांचे कुटुंबिय बोगद्याच्या बाहेर त्याच्या परतीची वाट पाहत आहेत. (Photo : PTI)
सिल्क्यरा येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांसाठी पाइपलाइनद्वारे औषधे, संत्री आणि ज्यूस पाठवण्यात येत आहे. याशिवाय मजुरांशी वॉकीटॉकीने संपर्क सुरु आहे. (Photo : PTI)
बोगद्यामध्ये चार्जर आणि बॅटरी पाठवण्याची योजना आहे. आज या बचावकार्याचा दहावा दिवस आहे.(Photo : PTI)
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्वीट करत सांगितलं आहे की, 'उत्तरकाशीतील सिल्क्यरा येथे निर्माणाधीन बोगद्यात अडकलेल्या मजुरांना पहिल्यांदा खिचडी पाठवण्यात आली आहे. (Photo : PTI)
त्यानंतर ते म्हणले, 'ढिगाऱ्यातून 6 इंच व्यासाचा पाइप आतमध्ये टाकण्यात आला आहे. या पाईपलाईनद्वारे आवश्यकतेनुसार अन्नपदार्थ, औषधे आणि इतर वस्तू कामगारांना सहज पाठवल्या जात आहेत.' (Photo : PTI)
केंद्रीय यंत्रणा, SDRF आणि राज्य प्रशासनाचे पथक अथक परिश्रम करत बचाव कार्यात गुंतलेले आहेत. सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर काम करत आहोत.' असं मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट केलं(Photo : PTI)