Tulip Garden: जम्मू काश्मीरमधील ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं; 16 लाखाहून अधिक फुलांनी खुलली बाग
काश्मीरमध्ये नवा पर्यटन हंगाम सुरू होताच आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन रविवारी पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपूर्वेतील सिराज बाग म्हणून ओळखले जाणारे इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन 2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सुरु केलं होते.
ट्युलिप गार्डन जबरवन पर्वत रांगाच्या पायथ्याशी स्थित असून आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन आहे.
ट्युलिप गार्डन सुमारे 30 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. काश्मीर खोऱ्यात फुलांची शेती आणि पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने हे उद्यान उघडण्यात आले होते. उद्घाटनच्या कार्यक्रमाला परदेशातील देखील पर्यटत उपस्थित होते.
या बागेत यावर्षी विविध प्रकारची सुमारे 15 लाख फुलांची लागवड करण्यात येते. परंतु यंदा त्याहून अधिक फुलांची लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत बागेत सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
फ्लोरिकल्चर विभागाचे शेख फयाज म्हणाले, महिनाभर गार्डन पर्यटकांसाठी खुले असणार आहे.
ट्युलिप गार्डनमध्ये यंदा 68 प्रकारच्या ट्युलिप्सची लागवड करण्यात आली आहेत. त्यापैकी चार नव्या जातीचे ट्यूलिप्स नेदरलँड येथून आणण्यात आले आहे.
फ्लोरिकल्चर विभागाचे शेख फयाज म्हणाले, महिनाभर गार्डन पर्यटकांसाठी खुले असणार आहे.
चार नव्या जातीचे ट्युलिप्स नेदरलँड येथून आणण्यात आले आहे.
ट्युलिपची फुले सरासरी तीन ते चार आठवडे टिकतात. परंतु मुसळधार पाऊस किंवा जास्त उष्णतेमुळे ती नष्ट होण्याची शक्यता जास्त असते.
फ्लोरीकल्चर विभागाकडून टप्प्याटप्प्याने ट्यूलिप्स लावण्यात येतात. जेणेकरून फुले बागेत महिनाभर किंवा त्याहून अधिक काळ टिकतील.
काश्मीर खोऱ्यात नवीन पर्यटन हंगाम सुरू झाल्याने पर्यटन विभागाने पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बागेत सांस्कृतिक कार्यक्रमाची योजना आखली आहे. ट्युलिप गार्डनला भेट देण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येतात.