Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World's Biggest Bird Statue : जगातील सर्वात मोठी पक्षाची मूर्ती; जिथे रावणाने कापले जटायूचे पंख, तिथेच उभारलं पार्क
Jatayu Nature Park : भारतात अनेक प्राचीन मंदिर, किल्ले आणि राजवाडे यासारखी अनेक ठिकाणं आहेत, जे आपल्या इतिहासाचे पुरावे आहेत. यासाठी अनेक पर्यटनस्थळं प्रसिद्ध आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतात असंच एक पार्क आहे. येथे जगातील सर्वात मोठी पक्षाची मूर्ती आहे. हे पार्क आहे केरळमध्ये. याचं रामायणासोबतही खास नातं आहे.
केरळमधील कोल्लम येथील 'जटायू नेचर पार्क' (Jatayu Nature Park) फार प्रसिद्ध आहे. जगभरातील कानाकोपऱ्यातून लोक येथे पर्यटनासाठी येतात. विशेष म्हणजे याचा रामायणाशी खास संबंध आहे.
रामायण, महाभारताचा संबंध असणारीही अनेक ठिकाणं प्रसिद्ध आहेत. रामायणातील जटायू पक्षी सर्वांनाच माहित आहे.
रावणाने सीतामाईचं हरण केलं तेव्हा जटायूने सीतामाईला वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी रावणाने जटायूला जखमी केलं.
रावणाने जिथे या जटायू पक्षाचे पंख कापले, त्याचं ठिकाणी हे जटायू पार्क उभारण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे पार्क 400 फूट उंचीवर उभारण्यात आलं आहे.
केरळच्या कोल्लममधील जटायू नेचर पार्क प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे उद्यान तयार करण्यासाठी तब्बल 10 वर्षांचा कालावधी लागला.
यामधील जटायू पक्षाची मूर्ती 150 फूट रुंदी, 70 फूट उंची आणि 200 फूट लांब आहे. ही जटायू पक्षाची मूर्ती भारतातील सर्वात मोठ्या मूर्तींपैकी एक असून जगातील सर्वात मोठी पक्षाची मूर्ती आहे.
हे पार्क एकूण 30 हजार स्क्वेअर फूट परिसरात पसरलेलं आहे. हा परिसर इतका मोठा आहे की, या जागेत सुमारे 14 टेनिस कोर्ट मावतील.
पौराणिक कथेनुसार, रावणाने पंख छाटल्यानंतर जटायू पक्षी चदयमंगलममधील डोंगराच्या माथ्यावर पडल्याचं स्थानिकांचं मत आहे.
सीतामातेचे रक्षण करण्यासाठी त्याने रावणाशी पराक्रमाने युद्ध केलं, पण म्हातारपणामुळे रावणाने जटायूचा पराभव केला. यानंतर जटायूने अपहरणाची माहिती प्रभू रामाला दिली. त्यानंतर ज्या टेकडीवर जटायू पक्षाने शेवटचा श्वास घेतला. तिथे ही मूर्ती उभारण्यात आल्याचं सांगितलं जातं.