Travel Tips : पावसाळ्यात चुकूनही 'या' ठिकाणी सुट्टीचा प्लॅन करु नका... सहलीची मजा नाही होईल फज्जा
पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणात फिरण्याची मजा काही वेगळीच असते. पण काही ठिकाणं अशी आहेत, जिथे पावसाळ्यात जाणं चुकीचं ठरेल. पावसाळ्यात या ठिकाणी चुकूनही येथे प्रवास करू नये, नाहीतर तुमची फजिती होईल. (PC:istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसाळ्यात स्वप्ननगरी मुंबईला कधीही भेट देऊ नये. पावसाळ्यात निम्म्याहून अधिक मुंबई बुडते. रस्त्यावर फक्त पाणीच-पाणी तुंबलेले दिसतं. पावसामुळे अनेक वेळा ट्रेनही रद्द होतात. पावसाळ्यात मुंबईला जाण्याऐवजी हिवाळ्यात मुंबईला भेट देणं चांगलं आहे. (PC:istock)
गोव्याला जायचं म्हणजं समुद्रकिनारी मजा करण्याचा प्लॅन असतो. पण, पावसामुळे तुम्हाला ही मजा घेता येणार नाही. गोव्याचे नाईट लाइफ खूप लोकांना आकर्षित करते. पण अनेक वेळा जोरदार पावसामुळे पार्टी रद्द होते. अनेकदा फ्लाईटही रद्द होतात किंवा प्रवासाला उशीर होतो. तुम्ही पावसाळ्यात गोव्याला जाण्याचा विचार करत असाल तर ही गोष्ट मनातून काढून टाका. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा गोव्याला भेट देण्याचा उत्तम काळ आहे. (PC:istock)
उत्तराखंड फार सुंदर ठिकाण आहे. पण उत्तराखंडमधील काही ठिकाणे पावसाळ्यात सुरक्षित नाहीत. उत्तराखंडमधील धारचुला, केदारनाथ, बागेश्वर, अल्मोडा ही काही ठिकाणे जिथे पावसाळ्यात येथे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. (PC:Google)
उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी भूस्सखलन आणि दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होऊ शकते. (PC:Google)
सिक्कीम हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. पण, पावसाळ्यात येथील वातावरण खूप खराब असतं. तसेच कायम भूस्खलनाची आणि पुराची भीती असते. (PC:Google)
कालिम्पाँड हे पश्चिम बंगालमधील एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. पण येथे अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे भूस्खलनाचा धोका आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथे जाणं खूप धोकादायक ठरू शकतं. भूस्खलनामुळे वाहतूक कोंडीतही अडकून पडावं लागू शकतं. (PC:Google)
ऋषिकेश हेही खूप सुंदर ठिकाण आहे. पण पावसाळ्यात येथे जाण्याची चूक तुम्ही करु नका. ऋषिकेश वॉटर एक्टिविटीजसाठी प्रसिद्ध आहे, पण पावसाळ्यात येथील सर्व वॉटर एक्टिविटीज बंद असतात, कारण पावसामुळे नदीची पातळी प्रचंड वाढते. (PC:Google)
पावसाळ्यात तुम्ही फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर त्या ठिकाणच्या हवामानाची योग्य माहिती घ्या, नाहीतर तुमच्या सुट्ट्यांची मज्जा निघून जाईल आणि तुम्हाला एन्जॉय करता येणार नाही. (PC:Google)