ना स्पेस स्टेशन, ना लाँचिंग पॅड... मग चंद्रावर गेलेले अंतराळवीर पृथ्वीवर कसे परततात?
चांद्रयान-3 चे प्रक्षेपण सतीश धवन स्पेस सेंटरवरून होणार आहे.(PC:PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रावर कोणतेही अंतराळ केंद्र किंवा लाँचर नाही. पृथ्वीवरून अंतराळयान प्रक्षेपित करण्यासाठी खूप तयारी करावी लागते. (PC:istockphoto)
सर्वात आधी अंतराळयान रॉकेटसह जोडलं जातं, नंतर ते लाँचिग पॅडवरून प्रक्षेपित केलं जातं. अनेक महिने आणि वर्ष संपूर्ण टीम एक अंतराळयान प्रक्षेपित करण्यासाठी काम करते. कोणतीही गोष्ट पृथ्वीवरून अंतराळात तेव्हाच जाऊ शकते जेव्हा ती पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण क्षेत्र ओलांडतं. (PC:istockphoto)
विज्ञानाच्या नियमांनुसार, कोणतीही वस्तू किमान वेग 11.2 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून बाहेर जाऊ शकते. त्यामुळे हा वेग प्राप्त करण्यासाठीच अंतराळयान लाँचिंग पॅडवरून प्रक्षेपित केलं जातं. त्यामुळे त्याला योग्य वेग प्राप्त होतो आणि ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेतून यशस्वीपणे बाहेर पडून अवकाशात प्रवेश करू शकतं.(PC:istockphoto)
पृथ्वीवरून चंद्रावर वाहने पाठवण्यासाठी अनेक अवकाश केंद्रे (Space Staion) आहेत. पण चंद्र अद्याप अंतराळ केंद्र (Space Staion) तयार करण्यात आलेलं नाही. तरीही, अंतराळयान सहजपणे पृथ्वीवर परत येते.(PC:istockphoto)
पृथ्वीवरून चंद्रावर जाण्यासाठी स्पेस स्टेशन किंवा लाँचिंग पॅडची गरज असते. मग, चंद्रावर स्पेस स्टेशन आणि लाँचिंग पॅड नसतानाही अंतराळयान पृथ्वीवर परत कसं येतं. अंतराळवीर आणि अंतराळयानाचा परतीचा प्रवास नेमका कसा असतो, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.(PC:istockphoto)
हा संपूर्ण खेळ एस्केप वेलॉसिटी (Escape Velocity) वर अवलंबून असतो. एस्केप वेलॉसिटी म्हणजे एखाद्या विशिष्ट ग्रहाच्या किंवा इतर वस्तूच्या गुरुत्वाकर्षणापासून वाचण्यासाठी शरीराचा सर्वात कमी वेग.(PC:istockphoto)
अंतराळात पाठवलेल्या अंतराळ यानामध्ये असलेले इंजिन अतिशय शक्तिशाली असतं, त्यामुळे अंतराळयान इंजिनाच्या बळावर चंद्राच्या कक्षेतून सहज बाहेर येऊ शकतं. (PC:istockphoto)
शक्तिशाली इंजिनामुळे अंतराळ यानाला 2.4 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने सहज गती मिळते आणि अंतराळयानाला पृथ्वीवर सहजपणे परतण्यास मदत करते.(PC:istockphoto)