Mini Switzerland : भारतातील 'मिनी स्वित्झर्लंड', इथे वर्षभर बर्फात खेळण्याचा आनंद घ्या...
स्वित्झर्लंडला जाण्याची अनेकांची इच्छा असते. पण, बजेटमुळे जर तुम्ही तिथे जाऊ शकत नसाल तर, तुम्ही भारतातील मिनी स्वित्झर्लंडला नक्की भेट द्या. (Image Source : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतातील औली (Auli) हे ठिकाण मिनी स्वित्झर्लंड (Mini Switzerland) म्हणून प्रसिद्ध आहे. (Image Source : istock)
औली (Auli) ला मिनी स्वित्झर्लंड (Mini Switzerland) म्हणतात. येथे तुम्ही वर्षभर बर्फाचा आनंद घेऊ शकता. भारतातील मिनी स्वित्झर्लंड (Mini Switzerland) बाबत अधिक सविस्तर वाचा. (Image Source : istock)
औली (Auli) उत्तराखंडमधील अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. येथे हिमालियन स्की रिसॉर्ट आहे. इथे तुम्ही वर्षाचे बारा महिने बर्फाचा आनंद घेता येईल. (Image Source : istock)
जगातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव औली येथे आहे. 25 हजार किलोमीटर क्षमतेचा हा तलाव 2010 साली बांधण्यात आला. (Image Source : istock)
औलीमध्ये बर्फवृष्टी नसताना या तलावाच्या पाण्यातून कृत्रिम बर्फ तयार केला जातो. बर्फ तयार करण्यासाठी इथे फ्रान्समधील कृत्रिम मशिन बसवण्यात आल्या आहेत. यामुळे तुम्ही वर्षाचे 365 दिवस इथे बर्फ पाहू शकता. (Image Source : istock)
औली अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. जंगल आणि बर्फाच्छादित डोंगरांनी वेढलेल्या या ठिकाणी गेल्यावर तुम्ही जणू स्वित्झर्लंडमध्ये गेल्याचा भास होईल. (Image Source : istock)
आशियातील सर्वात लांब रोपवे तुम्हाला येथे पाहता येईल. जोशीमठ ते औली हा 4.15 किमी लांबीचा रोपवे जगभरात प्रसिद्ध आहे. (Image Source : istock)
औली येथे तुम्ही वर्षभरात कधीही जाण्याचा प्लॅन करु शकता. पण नोव्हेंबर ते मार्च दरम्यानचा काळ येथे सुट्ट्या घालवण्यासाठी जास्त अनुकूल आहे. (Image Source : istock)
दरम्यान, नोव्हेंबर ते मार्चया काळात तुम्हाला येथे जाता आलं नाही, तर तुम्ही त्यानंतरही तिथे जाऊ शकता. (Image Source : istock)
येथे कृत्रिम बर्फ तयार केला जातो. त्यामुळे तुम्ही कधीही या मिनी स्वित्झर्लंडमध्ये फिरण्यासाठी जाऊ शकता. (Image Source : istock)