Rahul Gandhi: राहुल गांधींचा रेल्वेतून बिलासपूर ते रायपूर असा 117 किमी प्रवास, स्लीपर कोचमध्ये लोकांशी बोलत जाणून घेतल्या समस्या
बिलासपूर ते रायपूर असा 117 किलोमीटरचा प्रवास स्लीपर कोच डब्यातून केला.यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिलासपूर ते रायपूर हा प्रवास करताना यावेळी ट्रेनमध्ये काही महिला हॉकीपटू देखील होत्या. त्यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधला
महिला हॉकीपटूंचे प्रशिक्षण आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत विचारणा केली.
राहुल गांधी बिलासपूरहून रवाना होणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसच्या स्लीपर कोचमध्ये चढले.
सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ते रायपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत ट्रेनमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल त्यांच्यासोबत होते
या वेळी काही प्रवाशांनी राहुल गांधी यांच्यासोबत सेल्फी देखील काढला
ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चॉकलेट्स खरेदी केले.
राहुल गांधी यांचा रायपूर ते बिलासपूर हा प्रवासही रेल्वेनेच ठरला होता. मात्र ट्रेनला उशीर झाल्याने त्यांचा प्रवास पुढे ढकलण्यात आला.