यंदा देशात चांगला पाऊस राहणार, पुढील आठवड्यात तापमानाचा पारा वाढणार
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार यावर्षी देशात चांगला पाऊस (Rain) राहणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमॉन्सून (Monsoon) भारतीय उपखंडात दाखल झाला आहे. यावर्षी पावसाळा चांगला असल्याची माहिती शेती प्रश्नाचे आणि हवामानचे अभ्यासक उदय देवळाणकर (Uday Devlankar) यांनी दिली आहे.
देवळाणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात देशात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय.
यावर्षी एकूण पावसाळा चांगल राहणार आहे. जूनमध्ये अधिकची उष्णता वाटणार आहे. नियमितप्रमाणे यावर्षी देखील जूनमध्ये पावसाला उशीर होईल हे नाकाराता येत नाही.
पार्श्वभूमीवर सर्वांनी पाण्याचे योग्य नियोजन करावं. तसेच फळबागा, बहुवार्षिक बागायत पिके जूनच्या पाहिल्या पंधरवड्यात अडचणीत येऊ शकतात असेही देवळाणकर म्हणाले.
सध्या देशाच्या अनेक भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे.
अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका देखील बसला आहे.
वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे.
राज्याच्या विविध भागात हवामान विभागानं अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. ईोगल