Amarnath Yatra: अमरनाथ यात्रा करण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात, यात्रा होईल सुफळ संपूर्ण
जर तुम्ही अमरनाथच्या यात्रेला जाणार असाल तर सुरुवातीला तुम्हाला चालण्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदररोज 4 ते 5 किलोमीटर चालण्याची तयारी केल्याने तुम्हाला या यात्रेमध्ये फायदा होऊ शकतो.
कारण अमरनाथच्या यात्रेदरम्यान बरेच अंतर पायी चालावे लागते. त्यामुळे यात्रेदरम्यान चालण्याची सवय असल्याच तुम्हाला फायदा होऊ शकतो.
अमरानाथची यात्रा खूप मोठी आणि कठिण असते. त्यामुळे स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे आवश्यक आहे.
त्यासाठी योगा आणि प्राणायाम करणे फायदेशीर ठरु शकते.
यात्रेदरम्यान जवळ रेनकोट, छत्री यांसारख्या गोष्टी जवळ ठेवाव्यात.
कारण अमरनाथमध्ये पावसाची शक्यता असते. तसेच यात्रेदरम्यान तुम्ही चांगले बूट वापरल्यास देखील फायदेशीर ठरु शकते.
यात्रेदरम्यान सोबत थोडे खाणे ठेवल्याने देखील तुम्हाला फायदा होऊ शकतो.
प्रवासादरम्यान तुमच्या वैद्यकीय सुविधेची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. तसेच तुमच्याजवळ प्रथमोपचार किट देखील ठेवावे.
तसेच प्रवासादरम्यान जवळ काही रोख रक्कम देखील ठेवा.