Amarnath Yatra 2023 : 'बम बम भोले'चा गजर... अमरनाथ यात्रेच्या पहिल्याच दिवशी सुमारे 8000 भाविकांनी घेतलं दर्शन
1 जुलैपासून पवित्र अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी 7,900 भाविक श्री अमरनाथ गुहेत बाबा बर्फानी यांच्या चरणी लीन झाले. (PC : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशनिवारी पहाटे बालाटल आणि पहलगाम येथून 5,600 यात्रेकरुंना रवाना करण्यात आलं होतं, इतर भक्तगण हेलिकॉप्टर द्वारे तेथे पोहोचले होते.(PC : PTI)
अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. यात्रेकरुच्या आरोग्यासाठी दोन तात्पुरती रुग्णालये सुद्धा उभारण्यात आली आहेत. (PC : PTI)
अमरनाथ यात्रेला मोठा जनसागर लोटण्याची शक्यता असल्याने दहशतवादाचं सावट आहे. यात्रेकरूंसाठी मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. (PC : PTI)
यात्रेच्या दृष्टीने सुरक्षा पथकं तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये लष्कर आणि पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), इंडो-तिबेट सीमा पोलिस (ITBP), सीआयएसएफ (CISF) आणि इतर सुरक्षा दलांचे कर्मचारी यांचा समावेश आहे.(PC : PTI)
पहलगाम आणि बालटाल बेस कॅम्पकडे (Base Camp) जाणाऱ्या मार्गावर आणि अमरनाथ गुहेच्या मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर शेकडो नवीन सुरक्षा बंकर बांधण्यात आले आहेत. (PC : PTI)
ड्रोनसह हायटेक तंत्रज्ञानाचाही सुरक्षा व्यवस्थेसाठी वापर करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर प्रशासन तसेच पोलीस प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलताना दिसत आहे. (PC : PTI)
पोलिसांकडून सुरक्षेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शिवाय परिसरात अतिरिक्त जवानही तैनात करण्यात आले आहेत. (PC : PTI)
अमरनाथ यात्रेदरम्यान यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी मोठ्या सुरक्षा ग्रिडपासून ते रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) टॅगपर्यंत सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केंद्र आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहेत. (PC : PTI)
62 दिवस चालणारी अमरनाथ यात्रा यावेळी शनिवारपासून सुरू झाली आहे. यंदाची अमरनाथ यात्रा आतापर्यंतची सर्वात मोठी यात्रा असल्याचं मानलं जातं आहे. (PC : PTI)