पोस्टाच्या या योजनांमधून मिळेल अधिक फायदा, करमुक्तीचा देखील मिळेल लाभ
तसं पाहायला गेलं तर गुंतवणुकीचे बरेच पर्याय सध्या उपलब्ध आहेत. परंतु बरेच लोक रिस्क फ्रि योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देतात. त्यामुळे पोस्टच्या योजना हा गुंतवणूकीसाठी उत्तम पर्याय असल्याचं म्हटलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत ज्या बँकांच्या एफडीवरील व्याजदरांपेक्षा अधिक व्याजदर देतात. तसेच या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला करमुक्तीचा देखील लाभ मिळेल.
जर तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी देखील गुंतवणूक करु शकता. त्यासाठी तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचा पर्याय निवडू शकता.
यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्तीची सवलत मिळू शकते. तसेच तुम्हाला या योजनेमध्ये आठ टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळू शकते.
तसेच पोस्टाच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.7 टक्के व्याजदर मिळेल.
तसेच तुम्हाला या खात्यामध्ये जमा असलेल्या एकूण रकमेच्या 1.5 लाखापर्यंत वर्षाला करमुक्तीची सवलत मिळेल.
पोस्टाच्या जेष्ठ नागरिकांच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास 8.2 टक्क्याने व्याजदर मिळेल.
तसेच टाइम डिपॉजिट या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला पाच वर्षांसाठी 7.5 टक्के व्याजदर मिळेल.
जर एसबीआय बँकेच्या मुदत ठेव योजना पाहिली तर पाच वर्षांसाठी सामान्य नागरिकांना 6.50 टक्के व्याजदर मिळेल. तर जेष्ठ नागरिकांना 7.50टक्के व्याजदर मिळेल.