New Parliament Building : पाहा भारताच्या नव्या भव्यदिव्य संसद भवनाचे फोटो!
नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी करण्यात येणार आहे (PTI Photo/Manvender Vashist Lav)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nrendra Modi) यांच्या हस्ते सकाळी करण्यात येईल. यासाठी संसद भवनात सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. (PTI Photo/Manvender Vashist Lav)
होम-हवनापासून ते राजदंडाची प्रतिष्ठापना करण्यापर्यंतचे सर्व विधी या उद्घाटनाच्या वेळी करण्यात येणार आहेत. (PTI Photo/Manvender Vashist Lav)
या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. (PTI Photo/Manvender Vashist Lav)
हा संपूर्ण सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी सध्या दिल्लीमध्ये तयारी सुरु आहे. 28 मे रोजी सकाळी तमिळनाडूतील मठाचे 20 साधू-संत वैदिक विधींनुसार लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ सेंगोल म्हणजेच राजदंड लावतील. (PTI Photo/Manvender Vashist Lav)
त्यानंतर सर्वधर्मीय प्रार्थना सभा करण्यात येईल. या सोहळ्याला शंकराचार्यांसह अनेक महान विद्वान, पंडित, संत उपस्थित राहणार आहेत. (PTI Photo/Manvender Vashist Lav)
यामध्ये सर्व धर्माचे गुरु सहभागी होणार आहेत.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करतील. तसेच उभसभापती हरिवंश हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या संदेशाचे वाचन देखील करतील. (PTI Photo/Manvender Vashist Lav)
या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात राष्ट्रगीताने होईल. यावेळी नाणे आणि टपाल तिकीट देखील काढण्यात येणार आहे. (PTI Photo/Manvender Vashist Lav)
तसेच यावेळी 75 रुपयांचे नाणे देखील काढण्यात येईल. तर दुपारी अडीच या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. (PTI Photo/Manvender Vashist Lav)
ही संसदेची नवी इमारत चार मजली आहे तर या संसदेला सहा प्रवेशद्वार आहेत. या संसद भवनात लोकसभेचे एक हजार आणि राज्यसभेचे जवळपास 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. (PTI Photo/Manvender Vashist Lav)
नव्या संसद भवनात प्रत्येकासमोर छोटे बाक असतील. (PTI Photo/Manvender Vashist Lav)
तसेच या बाकांमध्ये हजेरी,मतदान तसेच भाषांतर ऐकण्यासाठी आत्याधुनिक सुविधा असतील. (PTI Photo/Manvender Vashist Lav)
याशिवाय या संसद भवनात 120 कार्यालयं आणि म्युझियम तसेच गॅलरीही असतील. (PTI Photo/Manvender Vashist Lav)
सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण सांसद टिव्ही या वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच अनेक प्रसार माध्यमांच्या वाहिन्यांवर देखील या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येईल. (PTI Photo/Manvender Vashist Lav)