Busiest Airport in India: 'ही' आहेत भारतातील सर्वात व्यस्त विमानतळं
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र झपाट्याने वाढ होत आहे.यासोबतच विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढताना पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया भारतातील सर्वात व्यस्त विमानतळांविषयी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोलकात्ता मधील नेताजी सुभाष चंद्र बोस हे विमानतळ भारतातील पाचव्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ आहे.
Simple Flying या संस्थेच्या अहवालानुसार, मागील वर्षात या विमानतळावरुन 66,812 विमानांनी उड्डाण केलं.
या यादीमध्ये चौथ्या स्थानावर हैद्राबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
या विमानतळावरुन गेल्या वर्षी 79,024 विमानांनी उड्डाण केलं होतं.
बंगळूर हे भारतातील तिसरे सर्वात व्यस्त विमानतळ आहे.
गेल्या वर्षी या विमानतळावरुन 1,11,010 विमानांनी उड्डाण केलं होतं.
मुंबईतील छत्रपती शिवजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ आहे.
गेल्या वर्षी या विमानतळावरुन 1,44,401 विमानांनी उड्डाण केलं होतं.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पहिल्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ आहे.
गेल्या वर्षी या विमानतळावरुन 2,12,431 विमानांनी उड्डाण केलं होतं.