Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरात किनारपट्टीला धोका! सौराष्ट्र आणि कच्छला ऑरेंज अलर्ट
बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढताना दिसत आहे, त्यामुळे हवामान विभागाने किनारपट्टी भागातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताच्या (India) गुजरात (Gujrat) किनारपट्टी भागात बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biporjoy) धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चक्रीवादळाची वाढती तीव्रता पाहता भारतीय हवामान विभागाने गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट (IMD Orange Alert) जारी केला आहे.
याआधी हवामान विभागाने या भागात येलो अलर्ट दिला होता. पण चक्रीवादळाची तीव्रता वाढताना दिसत आहे
बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईच्या समांतर पुढे सरकलं आहे. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान ओलांडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारी ताशी 125-135 किलोमीटर वाऱ्यांच्या वेगासह धडकणार असल्याची माहिती आहे. बिपरजॉय मांडवी ते कराची दरम्यान कुठे धडकणार अद्याप यासंदर्भात स्पष्टता नाही.
बिपरजॉय चक्रीवादळ 14 जूनला सकाळपर्यंत जवळजवळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. यानंतर चक्रीवादळ उत्तर-ईशान्य दिशेने सरकून 15 जूनच्या दुपारपर्यंत जखाऊ बंदर (गुजरात) जवळ मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यानची सौराष्ट्र आणि कच्छ आणि लगतची पाकिस्तान किनारपट्टी पार करेल.
यावेळी तीव्र चक्रीवादळ बिपरजॉयमुळे वाऱ्याचा वेग 125-135 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
चक्रीवादळामुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होण्याची शक्यता आहे. जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट देखील असल्याने चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.