Indian Railway:'या' रेल्वे गाड्यांच्या क्रॉसिंगसाठी राजधानी आणि शताब्दी रेल्वेलाही थांबावे लागते
यासाठी रेल्वेचे काही नियम आहेत. काय आहेत ते नियम जाणून घेऊया.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजधानी एक्सप्रेस ही भारतातली सर्वात महत्त्वाची रेल्वे मानली जाते. सर्व गाड्यांना थांबवून राजधानीस प्राधान्य दिले जाते.
याशिवाय अजून काही अशा रेल्वे आहेत ज्यांच्या क्रॉसिंगसाठी राजधानी आणि शताब्दी गाड्यांनाही थांबवले जाते.
राजधानी आणि शताब्दी या भारतीय रेल्वेच्या विशेष गाड्या आहेत. परंतु एखादी ट्रेन विशिष्ट कारणास्तव किंवा विशेष परिस्थितीत धावल्यास तिला प्रथम प्राधान्य दिले जाते.
वैद्यकीय उपकरण असेलेल्या रेल्वेला जास्त महत्त्व दिले जाते. दुसरी कोणतीही गाडी रुळावर आली की ती गाडी थांबवून ही गाडी पुढे नेली जाते.
भारताचे राष्ट्रपती वापरत असलेल्या गाड्यांनाही प्रथम प्राधान्य दिले जाते. सर्व गाड्या थांबवून त्यांची गाडी पुढे नेली जाते.
जरी आता राष्ट्रपती विमानाने प्रवास करत असले तरीही राष्ट्रपतींच्या गाडीसाठी रेल्वेचा हा नियम आहे.
राजधानीनंतर शताब्दी, दुरांतो, तेजस आणि गरीब रथ या गाड्यांना प्राधान्य दिले जाते. या सर्व गाड्या सुपरफास्ट गाड्या आहेत.