Tomato : टोमॅटोच्या दरात मोठी घसरण
सध्या देशातील टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेशमध्ये एक किलो टोमॅटोला दोन रुपयांचा दर मिळत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
हवामान बदलाचा मोठा परिणाम पिकांवर झाला आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठे अवकाळी पावसाचा फटका टोमॅटो पिकाला बसला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये टोमॅटो उत्पादक शेतककऱ्यांना मोठा फटका बसत आहे. टोमॅटोच्या दरात दिवसेंदिवस घट होत असल्याचं चित्र दिसत आहे.
टोमॅटोचे दर हे किलोमागे दोन रुपयांवर पोहोचले आहेत. उष्णतेचा परिणाम सर्वच भाज्यांवर झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षी टोमॅटोला 400 ते 500 रुपये प्रति कॅरेटचा भाव शेतकऱ्यांना मिळत होता. मात्र, यावेळी प्रति कॅरेट टोमॅटोला केवळ 150 ते 200 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
देशातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसत आहे.
गेल्या खरीप हंगामात पूर, पाऊस आणि दुष्काळानं शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी केली होती. त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले होते.
यावर्षी मार्चमध्येही पाऊस आणि गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, मोहरीच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. अशातच आचा टोमॅटो उत्पादक शेतकरी देखील चिंतेत आहेत.