दिल्लीतील नेहरु मेमोरियल संग्रहालयाचे नाव बदलून पीएम म्युझियम अँड लायब्ररी
14 ऑगस्टपासून या संग्रहालयाचे नामांतर करण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया नामांतराची प्रक्रिया जून महिन्यापासून सुरु झाली होती.
त्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली.
या संग्रहालयाच्या नामांतराचा निर्णय भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून घेण्यात आला होता.
हे संग्रहालय नवी दिल्लीमधील तीन मूर्ती भवन परिसरात आहे.
तीन मूर्ती भवन हे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचे अधिकृत निवासस्थान होते.
सांस्कृतिक मंत्रालयाने शुक्रवारी या संग्रहायलाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला.
या संग्रहालयासाठी स्थापन करण्यात आलेल्या परिषेदेचे उपाध्यक्ष ए. सूर्य प्रकाश यांनी ट्विटकरत या संदर्भात माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संग्रहालयाच्या नाव बदलाची संकल्पना मांडली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या संकल्पनेला नेहरु परिषदेने देखील मान्यता दिली आहे.