Atal Bihari Vajpayee: 13 दिवस पंतप्रधान, आयुष्यभर अविवाहित, आणीबाणीच्या काळात तुरुंगवास... जाणून घ्या अटलबिहारी वाजपेयींच्या आयुष्याशी संबंधित खास गोष्टी
अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील एका मध्यमवर्गीय शाळेतील शिक्षकाच्या पोटी झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजकारणात येण्यापूर्वी त्यांनी पत्रकारितेतून कारकिर्दीला सुरुवात केली. कुशल वक्तृत्वामुळे ते राजकारणात आले.
अटलबिहारी वाजपेयी 1947 मध्ये प्रचारक म्हणून राष्ट्रीय सेवक संघात सामील झाले. भारत छोडो आंदोलनात सहभागी झाल्यामुळे वाजपेयींना 23 दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं.
देशात आणीबाणीच्या काळात विरोधकांनी अटलबिहारींनाही तुरुंगात पाठवलं होतं. 1977 मध्ये जनता पक्षाच्या सरकारमध्ये अटलबिहारी परराष्ट्र मंत्री झाले, त्यानंतर त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात हिंदीत भाषण केलं, हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता.
अटल बिहारींना स्वतःचं कोणतंही मूल नसल्यामुळे त्यांनी राजकुमारी कौल यांची मुलगी नमिता कौल भट्टाचार्य हिला आपली दत्तक मुलगी मानलं. मुलगी या नात्याने नमितानेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केलं.
1998 मध्ये राजस्थानच्या पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी - 'ऑपरेशन शक्ती' अटल बिहारींच्या नेतृत्वाखाली झाली.
आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या अटलबिहारींच्या आयुष्यात त्यांची महाविद्यालयीन मैत्रिण राजकुमारी कौल यांच्याशिवाय दुसरी कोणतीही स्त्री नव्हती.
आपल्या राजकीय कारकिर्दीत अटलबिहारी वाजपेयी 10 वेळा लोकसभेवर आणि 2 वेळा राज्यसभेवर निवडून गेले. 16 मे 1996 रोजी ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले, मात्र त्यांचं सरकार 13 दिवसांनी पडलं. बहुमत सिद्ध करू न शकल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला.
16 ऑगस्ट 2018 रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी यांचं वयाच्या 93 व्या वर्षी दीर्घ आजाराने एम्समध्ये निधन झालं.