मुंबई, दिल्लीत नव्हे तर 'या' शहरात आहे भारतातील सर्वात महागडं हॉटेल, दिवसाचं भाडं ऐकून चकीत व्हाल
आपल्या देशात अनेक लक्झरी आणि शानदार हॉटेल्स आहेत. जिथे लोक राहतात आणि तिथल्या अप्रतिम सुविधांचा आनंद घेतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमुद्राच्या जवळ अनेक हॉटेल्स आहेत, तर अनेक हॉटेल्स डोंगरावर बांधलेली आहेत. हे हॉटेल्स शाही अन् अतिशय आलिशान आहे. अनेक हॉटेल्स फाईव्ह स्टार तर अनेक थ्री स्टार आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की देशातील सर्वात महागडे हॉटेल कोणते आहे?
देशातील सर्वात महागडे हॉटेल मुंबई, बंगळुरू आणि दिल्लीसारख्या हाय-टेक सिटीमध्ये नाही तर ते राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आहे.
जयपूरमधील राज पॅलेस हे देशातील सर्वात महागडे हॉटेल आहे, ज्याचं जुनं नाव द चोमू हवेली असं आहे. हे पॅलेस 1727 मध्ये तयार करण्यात आलं होतं.
1996 मध्ये राज पॅलेस ला हॉटेलचं रुप देण्यात आलं. या हॉटेलमधील हेरिटेज आणि प्रीमियम रूमसाठी एका रात्रीचे सर्वात कमी भाडे सुमारे 60 हजार रुपये आहे.
हिस्टोरिकल सुइटचे एका रात्रीचे भाडे 77 हजार रुपये, प्रेस्टीज सुइटचे भाडे 1 लाख रुपये, पॅलेस सुइटचे भाडे 5 लाख रुपये आणि प्रेसिडेंशियल सुइटचे भाडे 14 लाख रुपये इतके आहे.