राजकोट गेम झोन अग्नितांडव, 32 जणांचा होरपळून मृत्यू; पाहा अंगावर शहारे आणणारे PHOTO
Rajkot TRP Game Zone Fire Updates: राजकोटच्या 'गेमिंग झोन'मध्ये लागलेल्या आगीत 30 जणांचा मृत्यू झाला. अंदाजे तीन तासांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'गेमिंग झोन'मध्ये लागलेल्या भीषण आगीतून उठणारे धुराचे लोट अनेक किलोमीटर दूरून दिसत होते. अपघाताच्या वेळी ‘गेमिंग झोन’मध्ये किती लोक उपस्थित होते, हे अद्याप कळू शकलेले नाही.
राजकोटमधील टीआरपी गेमिंग झोन अपघातात मृतांचे मृतदेह इतके जळाले आहेत की, त्यांची ओळख पटवणं कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत त्यांची ओळख डीएनए चाचणीद्वारे केली जाईल.
'गेमिंग झोन'मध्ये दुरुस्ती आणि नूतनीकरणाचं काम सुरू असल्याचं घटनास्थळी उपस्थित लोकांचं म्हणणं आहे. अनेक ठिकाणी प्लाय आणि लाकडाचे तुकडे पडले होते. त्यामुळे आग पसरतच राहिली, मात्र आग कशी लागली, हे कळू शकले नाही.
आगीमुळे संपूर्ण गेम झोन जळून राख झाला. आगीचे धुराचे लोट जवळपास 5 किलोमीटरपर्यंत दिसत होते.
न्यूज एजन्सी IANS नुसार, गेम झोनच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. गेम झोनच्या इतर मालकांची ओळख पटली. ज्यामध्ये राहुल राठोड, प्रकाश जैन, मानवविजय सिंग सोलंकी आणि युवराज सिंह यांच्या नावाचा समावेश आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गेम झोनच्या घटनेसंदर्भात ट्विटरवर पोस्ट करून शोक व्यक्त केला.
या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारनं चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासोबतच जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी एसआयटीकडे सोपवण्यात आली आहे.