आता चांदण्या रात्रीही ताजमहाल पहा, 21 ऑगस्टपासून रात्र दर्शन सुरू
ताजच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता ताजमहाल चांदण्या रात्रीही पहाता येणार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान, ताजमहाल 17 मार्च 2020 रोजी बंद करण्यात आला होता, तेव्हापासून ताजमहालमधील रात्रीचे दर्शन बंद होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहिल्या लाटेत ताजमहाल 188 दिवसांच्या बंदिवासानंतर उघडण्यात आला होता आणि दुसऱ्या लाटेत ताजमहाल 61 दिवस बंद झाल्यानंतर उघडण्यात आला होता. मात्र, पहिल्या लाटेपासून रात्रदर्शन बंद होतं.
कोरोना प्रकरणांमध्ये घट लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने 21 ऑगस्टपासून ताजमहालचे रात्रीचे दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या पौर्णिमेच्या दिवशी, 21, 23 आणि 24 ऑगस्ट रोजी ताजमहाल रात्रीच्या दर्शनासाठी खुला केला जात आहे. रात्रीच्या दर्शनासाठी तीन स्लॉट राखीव ठेवण्यात आले आहेत. रात्री 8.30 ते रात्री 10 पर्यंत अर्ध्या-अर्ध्या तासांसाठी तीन स्लॉट ठेवण्यात आले आहेत.
ताजमहालच्या रात्रीच्या दर्शनासाठी तिकीट व्यवस्था पूर्वीप्रमाणेच ऑनलाइन राहील आणि सर्व औपचारिकता एक दिवस अगोदर पूर्ण करावी लागेल. आता अशा परिस्थितीत, लोक 50-50 स्लॉटमध्ये अर्धा-अर्धा तास तीन सत्रांमध्ये ताज पाहू शकतील.
ताजमहालचे रात्रीचे दर्शन पौर्णिमेच्या रात्री केले जात असल्याने, दोन दिवस आधी आणि त्यानंतर दोन दिवस असते.
अशात शुक्रवारी साप्ताहिक सुट्टीमुळे आणि शनिवार व रविवारच्या लॉकडाऊनमुळे ताज रविवारी रात्री पहाता येणार नाही. जर पौर्णिमेच्या 5 दिवसात शुक्रवार आणि रविवारी पडला तर.
कोविड 19 अंतर्गत उत्तर प्रदेश सरकारने लादलेली दोन दिवसांची साप्ताहिक बंदी रद्द करण्यात आली आहे. आता एक दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे ताजमहाल शनिवारीही पर्यटकांसाठीही खुला राहणार आहे.