Independence Day 2021: स्वातंत्र्यदिनी पहायला मिळाला अद्भूत नजारा; अनेक ऐतिहासिक इमारती तिरंग्यात उजळून निघाल्या
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ऐतिहासिक इमारती तिरंग्याच्या रंगांनी उजळून निघालेल्या पहायला मिळाल्या. तिरंग्याच्या प्रकाशात उजळलेल्या हैदराबादच्या ऐतिहासिक चारमीनारचे हेदृश्य काल रात्री पाहण्यासारखे होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी टर्मिनसची ही जुनी ऐतिहासिक इमारत सुंदर कोरीवकामासाठी ओळखली जाते. ताजमहाल नंतर या वास्तूचे देशात सर्वाधिक फोटो काढला जातात. काल रात्री स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तिरंग्याच्या रंगांनी ही इमारत उजळली.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकही देशभक्तीच्या रंगात दिसत होते. स्वातंत्र्याच्या पवित्र सणाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्ली रेल्वे स्टेशनची इमारत तिरंग्याच्या रुपात दिसली.
मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळही काल तिरंग्याच्या रंगांनी उजळून निघालेले दिसले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला येथील अंतर्गत भाग अतिशय सुंदर पद्धतीने तिरंग्याच्या रंगांनी सजवण्यात आला होता.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काल रात्री जोधपूर जंक्शनचे दृश्यही पाहण्यासारखे होते. स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी, तिरंग्याच्या प्रकाशाने ते अतिशय सुंदरपणे सजवण्यात आले होते.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, ईस्ट कोस्ट रेल्वे मुख्यालय रेल्वे सदन देखील तिरंग्याच्या रंगांनी उजळलेले दिसले.