Surat Diamond Bourse: 15 मजल्यांचे 9 टॉवर, 1 लाख स्क्वेअर फुटांची कार्यालयं; जगातील सर्वात मोठ्या ऑफिस बिल्डिंगचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
Surat Diamond Bourse Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज सूरतमध्ये (Surat) सूरत डायमंड बोर्सचं (Surat Diamond Bourse) उद्घाटन करणार आहेत, जी जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग असल्याचं म्हटलं जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वात उंच पुतळ्यानंतर जगातील सर्वात मोठ्या कार्यालयाचा विक्रमही भारताच्या नावावर होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सूरतमध्ये जगातील सर्वात मोठ्या कार्यालयीन इमारतीचं उद्घाटन करणार आहेत.
हा विक्रम सूरत डायमंड बोर्सच्या नावावर नोंदवला जाणार आहे. त्यामुळे सूरतच्या हिरे उद्योगात मोलाची भर पडणार आहे. हिरे आणि दागिन्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी हे जगातील सर्वात मोठं आणि आधुनिक केंद्र असेल.
सूरत डायमंड बाजारामध्ये रफ आणि पॉलिश अशा दोन्ही हिऱ्यांची खरेदी-विक्री केली जाईल. या अत्याधुनिक बोर्समध्ये अशा अनेक सुविधा असतील, ज्या हिरे आणि दागिन्यांचा व्यवसाय सुलभ आणि प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरतील.
सूरत डायमंड बोर्समध्ये आयात-निर्यातीसाठी आधुनिक कस्टम क्लिअरन्स हाऊस, किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल, आंतरराष्ट्रीय बँकिंग सुविधा आणि सेफ वॉल्ट इत्यादींची निर्मिती करण्यात आली आहे.
सूरत डायमंड बोर्सचं नाव यापूर्वीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग असं या इमारतीचं वैशिष्ट्य असणार आहे.
सूरत डायमंड बोर्सच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या सूरत जिल्ह्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे. याशिवाय ते सूरतला आंतरराष्ट्रीय विमानतळही भेट देणार आहेत.
ही इमारत 67 लाख स्क्वेअर फूटमध्ये बांधली असून तिच्या बांधकामावर सुमारे 3,500 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या इमारतीत सुमारे 4,500 डायमंड ट्रेडिंग ऑफिस एकाच वेळी काम करू शकतात.
या संपूर्ण इमारतीमध्ये प्रत्येकी 15 मजल्यांचे 9 टॉवर आहेत. यामध्ये 300 स्क्वेअर फुटांपासून ते 1 लाख स्क्वेअर फुटापर्यंतची कार्यालये बांधण्यात आली आहेत. या इमारतीला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून प्लॅटिनम मानांकनही मिळाले आहे.