Sun Halo Photos : निसर्गाचं भन्नाट रुप, बंगळुरुच्या अवकाशातील अद्भुत 'प्रभामंडला'चे फोटो व्हायरल
Sun Halo Photos: कोरोना संकटाच्या काळात लोक आपल्या घरात कैद झाल्यासारखे झालेत. कोरोना महामारीच्या या कठिण काळात लोकं दहशतीत आहेत. मात्र या महामारीनं आपल्याला शिकवलं आहे की, या संकटाच्या काळातून आपण बाहेर कसं पडायचं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशात आपल्या सभोवताली निसर्गात देखील अशा काही घटना घडत आहेत ज्या यादगार अशाच आहेत. कुठे चक्रीवादळाच्या रुपानं कहर होत आहे तर काही चांगल्या गोष्टी देखील पाहायला मिळत आहेत.
असाच एक नजारा बंगळुरुत पाहायला मिळाला आहे. बंगळुरुच्या अवकाशात सोमवारी खूप भन्नाट चित्र पाहायला मिळालं.
सू्र्याच्या चारी बाजूंनी गोलाकार असा सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसून आला. हे दृश्य इतकं भारी होतं की प्रत्येकाचं मन हे पाहून मोहून गेलं. प्रत्येकाला हे दृश्य आकर्षित करत होतं.
बंगळुरुच्या लोकांसाठी तर हा खास नजारा होता. काही जणांनी आपल्या कॅमेऱ्यात हा सुंदर क्षण कैद केला आहे. लोकांनी याचे फोटो काढून ट्विटरसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत.
एक ट्वीटर यूझर सम्युक्ता होनार्ड यांनी लिहिलं आहे की, इंद्रधनुष्यासमान प्रभामंडलानं आता सूर्याला आपल्या घेऱ्यात घेतलं आहे.
याला जादू म्हणा किंवा काही. या घटनेला प्रभामंडल म्हटलं जातं. हे वातावरणात बर्फाच्या क्रिस्टलसोबत प्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळं होतं, असं त्यांनी म्हटलं आहे.
हे सर्व फोटो @optimusprime699, @samyuktahornad, @trollpwnde, @NasirSajipa, @APWeatherman96, @PCMohanMP या ट्विटर हॅन्डलवरुन घेण्यात आले आहेत.