Hot Summer : चांदा ते बांधा लाहीलाही, उन्हाचा कडाका वाढला
उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असल्यामुळे पालक देखील मुलांसोबत पाण्यात भिजण्याचा आनंद घेत आहेत. एकमेकांवर पाणी उडवत नदीच्या पाण्यात सर्वच जण मज्जा घेत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउन्हाच्या झळा वाढल्याने गावागावांतील मुलांची पाऊलं थंडाव्यासाठी नदी किनाऱ्याकडे वळत आहेत. गर्मीपासून दिलासा मिळण्यासाठी मुलं पाण्यात डुबक्या मारताना दिसतात.
माणसांप्रमाणे प्राणी देखील उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. रांचीच्या बिरसा मुंडा प्राणी संग्रहालयातील हत्तींचं हे दृश्य देखील काहीसं बोलकंच आहे.
हत्तींप्रमाणे प्राणी संग्रहालयातील वाघ देखील तळ्यात उतरुन स्वतःला थंड करत आहे. मुक्या प्राण्यांची देखील तडपत्या उन्हामुळे अवहेलना होत आहे.
नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयातील हा बिबच्या पाहा. उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी बिबट्याने थंड ठिकाण शोधले आहे. झाडाच्या दाट सावलीत बिबट्या विसावला आहे.
दिल्लीत उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. आग्र्याच्या ताजमहालला भेट देताना उन्हापासून बचाव करण्यासाठी पर्यटक छत्री वापरताना दिसतात.
तीव्र उन्हाच्या झळांमुळे दिल्ली दर्शनाला येणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे. पावसाळ्यात जशी छत्री वापरावी लागते, तशीच काही परिस्थिती आता दिल्लीकरांवर ओढावली आहे.
वाराणसीतील माणसांच्या गर्दीमुळे सदा बहरलेला वाराणसी घाट देखील उन्हाच्या कडाक्यामुळे सुन्न पडला आहे. तापमानाचा पारा चढल्याने गंगा घाट निर्जन दिसत आहे.
गर्मीच्या दिवसात रस्त्यावरून सुरू असणारी वाहतूक देखील मंदावली आहे. उन्हामुळे दुचाकीस्वारांना घामाच्या धारा लागत आहेत. तर बरेच जण उन्हापासून वाचण्यासाठी चारचाकी एसीच्या वाहनांचा वापर करताना दिसतात.
नागपूरकरदेखील कडक उन्हाळ्यामुळे हैराण झाले आहेत. नागपुरात तर दुकानदारांनी चक्क रस्त्याच्या कडेलाच कुलरचा बाजार मांडला आहे.
उन्हाच्या झळा वाढल्यामुळे कुलरची मागणीही वाढली आहे. एसीची किंमत न परवडणाऱ्या सर्वसामान्यांची पाऊलं कुलर खरेदीकडे वळत आहेत.
कुलरप्रमाणे पंख्याची मागणीही वाढू लागली आहे. कुलर घेणंही न परवडणाऱ्या जनवर्गाची पसंती आजही टेबल फॅनलाच मिळते आहे.
उन्हाळा सुरू होताच कलिंगडाची मागणी वाढली आहे. घशाला थंडावा देणाऱ्या लालबुंद कलिंगडाचे दर मात्र यंदा वाढले आहेत. बाजारात कलिंगडाची आवकही वाढली आहे.
उन्हाचा कहर प्रचंड वाढत असल्याने डोके आणि चेहऱ्याला वाचवण्यासाठी स्कार्फ अथवा रुमालचा वापर केला जातोय. तरुणीही घरातून बाहेर पडण्यापूर्वी स्कार्फने स्वत:चा चेहरा झाकत आहेत.
दिवसरात्र रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवणाऱ्या ट्राफिक पोलिसांचीही दिवसा उन्हामुळे लाहीलाही होतेय. भर दुपारी थंडावा मिळण्यासाठी गार पाण्याचा आधार घेणारे हे दृश्य मन हेलावून टाकणारे आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनाही चांगलाच घाम फुटतो. अशातच ओसाड जमिनीवर तडपत्या उन्हात काम करणाऱ्या या स्त्रिचे दृश्यही तसेच आहे. उन्हामुळे पडलेली घशाची कोरड आणि तहान भागवण्यासाठी ही स्त्री मिळेल ते पाणी पिते आहे.