Sukhoi 30 MKI : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक विमानांची भर पडणार, 12 सुखोई 30 MKI खरेदी करण्यास परवानगी
एएनआयच्या वृत्तानुसार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 15 सप्टेंबर रोजी ही बैठक झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही सर्व विमाने मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे तयार केली जातील.
11000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात विमाने आणि संबंधित ग्राउंड सिस्टमचा समावेश असेल.
नव्याने ताफ्यात दाखल होणारी सुखोई 30 MKI लढाऊ विमाने ही त्या 12 विमानांची जागा घेणार ज्या विमानांचा गेल्यावर्षी अपघात झाला होता.
सुखोई विमान हे एक मल्टीरोल कॉम्बेट एअरक्राफ्ट आहे. हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.
DAC ने अंदाजे 45,000 कोटी रुपयांची तरतूद या 12 विमानांसाठी केली आहे.
ब्राह्मोससारखं संहारक क्षेपणास्त्र सुखोईमधून यशस्वीरित्या डागण्यात येते. सुखोईमध्ये बसवलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची रेंज 500 किमी आहे
भविष्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्रे मिकोयान मिग-२९ के, हलके लढाऊ विमान तेजस आणि राफेलमध्ये तैनात करण्याची योजना आहे.