हाड गोठवणाऱ्या थंडीत पर्यावरण संवर्धनासाठी रिअल रँचोचे उपोषण, आज उपोषणाचा तिसरा दिवस
लडाखमधील दोन तृतीयांश हिमनद्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्यावरुन गेल्या तीन दिवसांपासून सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. (Photo : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसामाजिक कार्यकर्ते, इंजिनिअर आणि इनोव्हेटर सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) हे लडाख (Ladakh) वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत. (Photo : PTI)
लडाखच्या थंड हवामानात सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरु आहे. बर्फवृष्टी सुरु असतानाही सोनम यांनी आपलं उपोषण सुरुच ठेवलं आहे. (Photo : PTI)
लडाखचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच लडाखच्या संरक्षणासंदर्भात अनेक मुद्दे त्यांनी मांडले आहेत. (Photo : PTI)
लडाखमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे. तिथे थंड वातावरण असतानाही लडाखच्या विविध प्रश्नांसाठी सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरु आहे. लडाखच्या थंड वातावरणात ते योगासने करत आहेत. (Photo : PTI)
बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट '3 इडियट्स'मध्ये आमीर खानने साकारलेली रणछोडदास छांछड उर्फ 'रँचो' ही व्यक्तिरेखा सोनम वांगचुक यांच्याकडून प्रेरित होती. (Photo : PTI)
3 इडियट्स या चित्रपटातील 'ऑल इज वेल' हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला, पण आज खुद्द सोनम वांगचुक हेच 'लडाखमध्ये ऑल इज नॉट वेल' म्हणजेच लडाखमध्ये सर्व काही ठीक नाही असं म्हणत आहेत. (Photo : PTI)
सोनम वांगचुक हे लडाखच्या आदिवासी, उद्योग आणि हिमनद्यांचा मुद्दा घेऊन आंदोलन करत आहेत. त्यांना सरकारनं नजरकैद केलं आहे. (Photo : PTI)
हाड गोठवणाऱ्या थंडीत सोनम वांगचुक उपोषण करत आहे. लडाखमध्ये उणे 18.5 अंश सेल्सिअस तापमान आहे. ( Photo : Sonam Wangchuk Facebook)