Kashmir Snowfall : काश्मीरमध्ये पांढऱ्याशुभ्र बर्फाची चादर, पाहा फोटो
कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांना थंडीपासून बचावाची व्यवस्था करावी लागत आहे. त्याचबरोबर पर्यटकही याचा पुरेपूर आनंद घेत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाश्मीरमधील राजदान पास, पीर की गली, झोजिला पास, सिंथान टॉप, सोनमर्ग आणि गुलमर्ग या खोऱ्यातील उंच भागात बर्फवृष्टी झाली.
त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. राझदान, झोजिला, किश्तवार, अनंतनाग आणि मुगल रोडसह अनेक रस्ते सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग शुक्रवारी रामबन जिल्ह्यातील मेहर भागाजवळ रस्त्यावर भूस्खलन आणि दगड पडल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
कुपवाडा प्रशासनाने सांगितले की 10 नोव्हेंबर रोजी हलका ते मध्यम पाऊस किंवा हिमवृष्टीच्या अंदाजामुळे, अनेक भागांसाठी चेतावणी जारी करण्यात आली आहे.
हवामान सुधारेपर्यंत लोकांना या भागात जाण्याचे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पृथ्वीवरील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या कश्मीरमध्ये सध्या पर्यटकांची देखील लगबग पाहायला मिळतेय.
हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पितीमध्येही ताज्या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर बर्फाची पांढरी चादर पसरली आहे.