Covid JN.1 : ऐन दिवाळीत कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं, जगभरात नवा व्हेरियंट JN.1ची चर्चा, लक्षणं काय?
जगभरात हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरस अजूनही पूर्णपणे नष्ट झालेला नाही. जसजसा काळ पुढे जातोय, तसतसे कोरोना व्हायरसचे नवे व्हेरियंट्स समोर येत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऐन दिवाळीत कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. भूतकाळात कोरोना व्हायरसनं घातलेला हैदोस पाहता. ऐन सणासुदीत कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा सामना पुन्हा एकदा करावा लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत बोलायचं झालं तर, सध्या पुन्हा एकदा कोविड JN.1 हा नवा व्हेरियंट अनेक रुग्णांमध्ये आढळून आला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगाची धाकधूक पुन्हा एकदा वाढली आहे. नव्या व्हेरियंटमुळे शास्त्रज्ञांची चिंता आणखी वाढली आहे.
कोरोना कधी संपणार की, वेळेनुसार सातत्यानं बदलत राहणार, असा प्रश्न सध्या शास्त्रज्ञांसमोर उभा ठाकला आहे. कोरोना JN.1 च्या नव्या व्हेरियंटबाबत शास्त्रज्ञ खूप चिंतेत आहेत. कारण त्यांचं म्हणणं आहे की, हा प्रकार इतर प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. इतकंच नाही तर ते आपल्या प्रतिकारशक्तीसाठी खूप धोकादायक आहे.
JN.1 हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आहे. सध्या जगभरातील अनेक रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
JN.1 व्हेरियंट अधिक संसर्गजन्य असल्याचं सांगितलं जात आहे. नवा कोविड प्रकार BA.2.86 च्या कुटुंबातून उदयास आला आहे. JN.1 प्रकारातील स्पाईक प्रोटीनमध्ये 41 म्यूटेशन झालं आहेत. आतापर्यंत सापडलेल्या सर्व प्रकारांमध्ये या प्रकारात जेवढे बदल पाहिले गेले आहेत, तेवढे बदल झालेले नाहीत.
JN. 1 प्रकाराची लक्षणं जुन्या व्हेरियंट्ससारखीच आहेत. थंडी वाजणं, ताप येणं, छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणं, घसा खवखवणं आणि घशात वेदना होणं.
अंगदुखी, डोकेदुखी आणि सर्दी, उलट्या आणि मळमळ, चव किंवा वास कमी होणं, हीदेखील लक्षणं आहेत.
जे XBB.1.5 आणि HV.1 च्या रूपांपेक्षा कितीतरी पटीने जास्त धोकादायक आहे. SARS-CoV-2 प्रकार JN.1 इंग्लंड, फ्रान्स, आइसलँड आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये वेगाने पसरत आहे.
25 ऑगस्ट रोजी लक्झेंबर्गमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट पहिल्यांदा आढळून आला आहे. त्यानंतर इतर देशांमध्ये त्याचे स्ट्रेन सापडले. सर्वात त्रासदायक बाब म्हणजे, नव्या व्हेरियंटमुळे ज्या लोकांचा बळी जात आहे, त्यांच्यावर कोविड लसीचा कोणताही परिणाम होत नाही. आतापर्यंत, भारतात या प्रकाराच्या एकाही केसची पुष्टी झालेली नाही.