Snowfall : काश्मीर खोऱ्यासह हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टी, जनजीवन विस्कळीत; येलो अलर्ट जारी
जोरदार बर्फवृष्टी आणि भूस्खलनामुळे येथील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दोन्ही राज्यांमध्ये आतापर्यंत एकूण 176 मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. (PC:PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिमाचलमध्ये गेल्या 24 तासांत 10 पाणी पुरवठा संयंत्र आणि 470 वीज पुरवठा संयंत्र बंद करण्यात आले आहेत. हवामान खात्यानुसार पुढील 24 तास तापमानात सातत्याने घसरण सुरू राहणार आहे. (PC:PTI)
जम्मू आणि काश्मीरमध्ये हिमवर्षाव आणि भूस्खलनामुळे, काश्मीर खोऱ्याला देशाच्या इतर भागाशी जोडणारा एकमेव 270 किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 बंद झाला आहे. (PC:PTI)
लाहौल स्पिती, किन्नौर, चंबा, कुल्लू आणि किन्नौरमध्ये गेल्या 24 तासांत मोठ्या बर्फवृष्टी झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने डोंगराळ भागात येलो अलर्ट जारी केला आहे. (PC:PTI)
लाहौल स्पिती येथे सर्वात कमी तापमान असून ते उणे 3.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. हिमाचलच्या इतर भागात तापमान खूपच कमी राहिले. (PC:PTI)
कुकुमसेरीमध्ये उणे 1.3 अंश, कल्पामध्ये -0.4 अंश, नारकंडामध्ये -0.2 अंश, कुफरीमध्ये 2.2 अंश, मनालीमध्ये 2.6 अंश, डलहौसीमध्ये 1.9 अंश आणि शिमलामध्ये 5 अंश तापमान होते. 5 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
(PC:ANI)
हवामान विभागाने येत्या काही दिवसांत पर्वतीय प्रदेशातील राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा येलो अलर्ट जारी केला आहे. (PC:ANI)
पर्वतीय भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, सखल आणि मैदानी भागात हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. (PC:ANI)
उत्तर भारतातील हिमाचल, काश्मीर आणि उत्तराखंड या तीन राज्यांत जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी सुरूच आहे.
काश्मीर खोऱ्याला देशाच्या इतर भागांशी जोडणारा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग भूस्खलनामुळे ठप्प झाला आहे. NH-1 वरील पंथियाल कॅफेटेरिया वळण आणि दलवासजवळ 200 हून अधिक वाहने अडकली आहेत.