Turkey Earthquake : क्योंकी इन्सानियत अभी भी जिंदा है... तुर्की महिलेने बचाव करणाऱ्या भारतीय महिला अधिकाऱ्याला केलं Kiss, मनं जिंकतेय NDRF टीम
तुर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंपामध्ये 21,000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तुर्की प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य राबवलं जातं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय NDRF ची तीन पथकं तुर्कीमध्ये मदत आणि बचावकार्यासाठी पाठवण्यात आली आहेत. भारतीय जवान युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य राबवत आहेत. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
तुर्कीमध्ये भूकंपग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्य करत असलेल्या भारतीय लष्कराच्या महिला अधिकाऱ्याच्या गालावर चुंबन घेतानाचा तुर्की महिलेचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
भारताने संकटात सापडलेल्या तुर्कीला मदतीचा हात दिला आहे. भारताने NDRF च्या तीन पथकांसह मदतीचं साहित्य तुर्कीमध्ये पाठवलं आहे.
भारतीय बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
भूकंपग्रस्त तुर्कीच्या मदतीसाठी भारताने मदतीचा हात दिला आहे. 'ऑपरेशन दोस्त'द्वारे (Operation Dost) भारत भूकंपग्रस्त भागात मदत पोहोचवत आहे.
भूकंपग्रस्ताच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या तीन पथकांना विशेषत: श्वानपथक, वैद्यकीय आणि इतर आवश्यक उपकरणांसह भारतातून तुर्कीला पाठवण्यात आलं आहे. NDRF ची पथकं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना दिसत आहेत.
तुर्कस्तानमधील हताया (Hatay) येथे भारतीय लष्कराच्या फील्ड हॉस्पिटलमध्ये भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना वैद्यकीय उपचार दिले जात आहेत.
तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये मृतांची संख्या ही 21,000 च्या पुढे गेली आहे. हा गेल्या काही दशकातील सर्वात मोठा भूकंप आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी ट्वीट करत तुर्कीमधील बचाव आणि मदतीचे फोटो शेअर केले आहेत.
तुर्कीमधील लष्करी फील्ड हॉस्पिटलने वैद्यकीय, शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन वॉर्डमध्ये वैद्यकीय तपासणी सुरु आहे. एक्स-रे लॅब आणि मेडिकल स्टोअर उभारण्याच आलं आहे. येथे बाधित लोकांची 24 तास सेवा केली जाईल.
तुर्कीमध्ये मृतांच्या संख्येसोबतच जखमींची संख्याही सातत्याने वाढत आहे. भीती, वेदना आणि दु:खाच्या काळातही अनेक देशांमधून येणारी मदत तेथील लोकांना आशा देत आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाने तुर्की येथे एकूण चार विमाने पाठवली आहेत.