Chitrakoot : भारतात 'या' ठिकाणी प्रभू श्रीराम स्नान करायचे, देश-विदेशातील लाखो भाविक घेतात दर्शन
उत्तर प्रदेशातील चित्रकूटमधील रामघाट धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी प्रभू श्रीराम अंघोळ करायचे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रभू राम आणि सीता यांच्यासह लक्ष्मणाने 14 वर्षे वनवास केला. त्यातील 11 वर्ष ते चित्रकूट येथे वास्तव्यास होते. त्यावेळी प्रभू श्रीराम रामघाटावर स्नान करायचे.
मंदाकिनी नदीच्या किनारी असलेल्या रामघाटाचं धार्मिक महत्व आहे. या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येतं.
रामघाटावर सायंकाळी होणाऱ्या आरतीसाठी देश-विदेशातून भाविक येथे दाखल होत असतात.
चित्रकूट धाम रेल्वे स्टेशनपासून फक्त 10 किमी अंतरावर रामघाट आहे. तुम्ही टॅक्सीनेही येथे पोहोचू शकता.
चित्रकूटमधील कामदगिरी पर्वताला धार्मिक महत्व आहे. हिंदू धर्म आणि प्रभू श्रीरामांच्या भक्तांसाठी या पर्वताचं वेगळं महत्व आहे.
कामदगिरी पर्वताला 5 किमी लांब प्रदक्षिणा घातल्यावर कामतानाथ येथे पूजा केल्यावर मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
कामदगिरी पर्वतावर एक जल कुंड आहे. लंकेमध्ये हनुमानाच्या शेपटीला आग लावल्यानंतर आग विझवण्यासाठी ते याच ठिकाणी आले होते, असं सांगितलं जातं. यामुळे या कुंडाला हनुमान धारा असंही म्हटलं जातं. हनुमान धारा कुंडाजवळ हनुमानाची भव्य मूर्तीदेखील आहे.